क्रीडा

जगासमोर बोलण्याची भीती; नाओमीची फ्रेंच ओपनमधून माघार

सूरज यादव

ओसाकाने ट्विटरवरून सांगितलं की, खरंतर मी 2018 मध्ये झालेल्या अमेरिकन ओपनपासून मानसिक तणावाखाली आहे. तेव्हापासून मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी मला खूप धडपड करावी लागत आहे.

पॅरिस - जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाका हिने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. पहिल्याच सामन्यानंतर नाओमीवर दंडात्मक कारवाई झाली होती. सामन्यानंतर माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिल्यानं नाओमीला 15 हजार डॉलर्सचा दंड केला होता. या दंडात्मक कारवाईनंतर आपण फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. पहिल्या फेरीत नाओमीने विजय मिळवला आहे. दंडाची रक्कम तिच्या बक्षिसातून कपात करण्यात येणार आहे.

फ्रेंच ओपनमधून माघार घेतल्यानंतर नाओमीने म्हटलं की, 'पहिल्या फेरीत जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत न गेल्याबद्दल 15 हजार अमेरिकन डॉलर इतका दंड करण्यात आला. त्यानंतर स्पर्धेतून माघार घेत आहे. मी काही पब्लिक स्पीकर नाही. जगाच्या माध्यमांसमोर बोलण्याआधी मला खूप भीती वाटते.'

ओसाकाने ट्विटरवरून सांगितलं की, खरंतर मी 2018 मध्ये झालेल्या अमेरिकन ओपनपासून मानसिक तणावाखाली आहे. तेव्हापासून मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी मला खूप धडपड करावी लागत आहे. पॅरिसमध्ये आधीपासूनच मला असुरक्षित वाटत होतं. त्यामुळे मी विचार केला की आपल्या चांगल्यासाठी पत्रकार परिषद सोडणं चांगलं. मी याची घोषणा आधीच केली होती कारण मला वाटतं की, या नियमाचा काही भाग हा जुना आहे आणि त्याकडे लक्ष वेधायचे होते.

ओसाकाने स्पर्धेपूर्वीच मीडियासमोर न बोलण्याचा पवित्रा घेतला होता. पहिल्या सामन्यानंतर ती आपल्या मतावर ठाम राहिली. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला टेनिसपटूने बुधवारी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली होती. या भूमिकेमुळे माझ्यावर जी दंडात्मक कारवाई केली जाईल ती रक्कम चॅरिटीला देईन, असे तिने म्हटले होते. यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत नावोमी ओसाकाने दमदार सुरुवात केली होती. तिने 63 व्या मानांकित पॅट्रिसिया मारिया टिग हिला 6-4, 7-6 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT