french open 2022 rohan bopanna middelkoop lost 
क्रीडा

French Open 2022: रोहन बोपण्णाचे स्वप्न भंगले, फ्रेंच ओपन उपांत्य फेरीत पराभव

फ्रेंच ओपन टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि नेदरलँड्सचा मिडेलकोप यांचा पराभव

Kiran Mahanavar

फ्रेंच ओपन टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि नेदरलँड्सचा मिडेलकोप यांना पराभव पत्करावा लागला आहे. गुरुवारी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत बोपण्णा आणि मिडेलकोप यांच्यात सामना 12व्या मानांकित मार्सेलो अरेव्हालो आणि जीन-जूलियन रॉजर यांच्याकडून 6-4, 3-6, 6-7 (8-10) असा पराभव पत्करावा लागला.(French Open 2022 Rohan Bopanna Middelkoop Lost)

बोपण्णाने सात वर्षांत प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये १६व्या मानांकित बोपण्णा आणि मिडलकूपने सर्व्हिस तोडून २-१ अशी आघाडी घेतली होती. उपांत्य फेरीत सकारात्मक सुरुवात करून पहिला सेट 36 मिनिटांत 6-4 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा आणि मिडेलकोप यांनी 3-6 असा गमावला. तिसरा गेम टाय-ब्रेकरमध्ये गेला जिथे त्याना गती राखता आली नाही.

बोपण्णा-मिडेलकोप जोडीने उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनच्या लॉयड ग्लासपूल आणि फिनलंडच्या हॅरी हेलीओव्हारा जोडीवर शानदार विजय नोंदवला आणि उपांत्य फेरी गाठली होती. रोहन बोपण्णा 2015 मध्ये विम्बल्डनमध्ये शेवटचा ग्रँडस्लॅम सेमीफायनल सामना खेळला होता. मात्र त्याचा उपांत्य फेरीतच प्रवास संपुष्टात आला होता. भारताचा रोहन बोपण्णा प्रथमच फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT