French Open 2023 Daniil Medvedev 
क्रीडा

French Open 2023: डॅनिल मेदवेदेवला पराभवाचा धक्का! पात्रता फेरीमधून आलेल्या थियागो वाईल्डचा सनसनाटी विजय

सकाळ वृत्तसेवा

French Open 2023 : फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये मंगळवारी धक्कादायक निकालाची नोंद झाली. दुसरा मानांकित रशियाचा डॅिनल मेदवेदेव याला पराभवाचा सामना करावा लागला. पात्रता फेरीमधून आलेल्या ब्राझीलच्या थियागो वाईल्ड याने पाच सेटच्या झुंजीनंतर मेदवेदेवचे आव्हान संपुष्टात आणले.

थियागो याने पहिला सेट ७-६ असा जिंकत आघाडी घेतली. पण पुढील दोन सेटमध्ये मेदवेदेव याने ७-६, ६-२ असा विजय मिळवला आणि सामन्यात वर्चस्व निर्माण केले. थियागो याने चौथ्या सेटमध्ये ६-३ अशी बाजी मारली व बरोबरी साधली. मेदवेदेवला पाचव्या सेटमध्ये सूर गवसला नाही. अखेर ब्राझीलच्या खेळाडूने ६-४ असे यश मिळवले.

सहावी मानांकित कोको गॉफ हिने महिला एकेरीत रेबेका मासारोवा हिला हरवत पुढे पाऊल टाकले, पण या लढतीत विजय मिळवण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला. मासारोवा हिने पहिला सेट ६-३ असा जिंकला आणि १-० अशी आघाडी घेतली. गॉफने मात्र पुढील दोन गेममध्ये जबरदस्त खेळ साकारत झोकात पुनरागमन केले. गॉफने पुढील दोन सेट ६-१, ६-२ असे जिंकत सामनाही आपल्या नावावर केला. गॉफने या लढतीत एक तास व ४६ मिनिटांमध्ये विजय संपादन केला.

सातवी मानांकित जॅब्यूएर हिने लुसिया ब्रोंझेटी हिला सहज पराभूत केले. जॅब्यूएर हिने ब्रोंझेटी हिच्यावर ६-४, ६-१ अशी मात केली. जॅब्यूएर हिने मागील वर्षी उल्लेखनीय कामगिरी केली होती. विम्बल्डन व अमेरिकन या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये तिने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण दोन्ही ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत तिला पराभवाला सामोरे जावे लागले.

तीन सेटमध्ये विजय

आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान यश संपादन करण्याची क्षमता असलेला पण अद्याप एकही ग्रँडस्लॅम न जिंकलेला जर्मनीचा २६ वर्षीय टेनिसपटू ॲलेक्झँडर झ्वेरेव याची फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅमची सुरुवात छान झाली आहे. त्याने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीच्या लढतीत लॉईड हॅरीस याला पराभूत करीत आगेकूच केली. झ्वेरेव याने या लढतीत ७-६, ७-६, ६-१ असा विजय मिळवला. झ्वेरेवला पहिल्या दोन सेटमध्ये विजय मिळवण्यासाठी मेहनत करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT