Satwik-Chirag Won French Open 2024 Marathi News sakal
क्रीडा

French Open Badminton : सात्विक-चिराग जोडीची कमाल! फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपदावर दुसऱ्यांदा उमटवली मोहोर

भारताची अनुभवी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी रविवारी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावताना संस्मरणीय कामगिरी केली....

Kiran Mahanavar

Satwik-Chirag Won French Open 2024 : भारताची अनुभवी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी रविवारी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावताना संस्मरणीय कामगिरी केली. सात्विक-चिराग जोडीने ली हुए-यांग सुआन या चीन तैपईच्या जोडीवर सरळ दोन (२१-११, २१-१७) विजय मिळवला.

भारताच्या या जोडीला मागील तीन स्पर्धांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, पण यंदा त्यांनी अंतिम फेरीचा अडथळा लीलया ओलांडला. फ्रेंच ओपन स्पर्धा त्यांनी दुसऱ्यांदा जिंकली हे विशेष.

सात्विक-चिराग व ली-सुआन या जोडीमध्ये पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ४-४ अशी बरोबरी झाली. त्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चुकांचा फायदा घेत भारतीय जोडीने सलग पाच गुण मिळवत ९-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीयांच्या झंझावातासमोर चीनच्या खेळाडूंचा निभाव लागला नाही. १५-८ अशी आघाडी मिळवताना भारतीयांनी दमदार कामगिरी केली. पहिला गेम २१-११ असा अवघ्या १५ मिनिटांत त्यांनी जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये कडवी झुंज

चीनच्या खेळाडूंकडून भारतीय जोडीला दुसऱ्या गेममध्ये कडवी झुंज देण्यात आली. सुरुवातीला ५-५ अशा बरोबरीनंतर चीनच्या खेळाडूंनी १३-११ अशी आघाडी मिळवत भारतीय जोडीवर दबाव टाकवण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करीत झोकात पुनरागमन केले. भारतीय जोडीने १९-१५ अशी आघाडी घेतली. याप्रसंगी मागील १० पैकी ८ गुण भारतीय जोडीने मिळवले हे विशेष. अखेर २१-१७ असा दुसरा गेम जिंकून सात्विक - चिराग जोडीने तीन उपविजेतेपदानंतर अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT