French Open French Open twitter
क्रीडा

French Open : लाखोंच्या गराड्यात पहिल्यांदाच नाईट मॅचेस

कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत (corona pandemic) देखील यंदाच्या वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा (Grand Slam tennis) पार पडणार आहे.

सुशांत जाधव

कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत (corona pandemic) देखील यंदाच्या वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा (Grand Slam tennis) पार पडणार आहे. 30 मे पासून सुरु होणाऱ्या स्पर्धेतील सामने पहिल्यांदाच रात्रीच्या वेळेत खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या प्रोटोकॉलसह (Corona Protocol) ही स्पर्धा रंगणार असून जवळपास 1 लाख 18 हजार लोकांना या स्पर्धेसाठी एन्ट्री देण्यात येणार आहे. (french open covid 19 times spectators and night matches to debut)

फ्रेंच ओपनच्या (French Open) आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसमध्ये रंगणाऱ्या स्पर्धेत प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी परवानगी दिली जाईल. पहिल्या 10 दिवसांत 5000 हून अधिक प्रेक्षकांना एन्ट्री देण्यात येणार आहे. याशिवाय तीन अन्य कोर्टवर 1000-1000 प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल. स्पर्धेतील उर्वरित सामन्यात प्रत्येक कोर्टवर जवळपास 5 हजार प्रेक्षक बसतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटात फ्रेंच ओपन स्पर्धा 30 मे ते 13 जून दरम्यान होणार आहे. मागील वर्षी 15 हजार चाहत्यांना सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर एन्ट्री देण्यात आली होती. फ्रेंच ओपन 2021 स्पर्धेत सरभागी होणाऱ्या खेळाडूंची दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी सामन्याला सुरुवात सुरुवात होण्यापूर्वी खेळाडूला कोरोना चाचणीच्या प्रक्रियेतून जावे लागेल. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या खेळाडूंनाच कोर्टवर प्रवेश देण्यात येईल. यंदाच्या वर्षी पहिल्यांदा स्पर्धेतील सामने रात्रीच्या वेळेस खेळवले जातील. पुरुष आणि महिला गटातील प्रत्येकी दोन दोन सामने रात्रीच्या वेळेस रंगतील.

french open covid 19 times spectators and night matches to debut

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT