French Open Daniil Medvedev Stefanos Tsitsipas crashed out in the fourth round  ESAKAL
क्रीडा

French Open : मेद्वेदेव, तित्सिपासला पराभवाचा धक्का

अनिरुद्ध संकपाळ

पॅरिस : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या डॅनिल मॅद्वेदेव (Daniil Medvedev) आणि चौथ्या स्थानावर असलेल्या स्टेफानोस टित्सिपास (Stefanos Tsitsipas) यांना फ्रेंच ओपनच्या (French Open) चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. तर महिला सिंगल्समध्ये टॉप सिडेड स्विआतेकने आपला 32 सामने जिंकण्याचा सिलसिला कायम ठेवला.

अमेरिकन ओपनचा विजेता डॅनिल मॅद्वेदेवला 20 व्या सीडेड मारिन सिलिकने 6-2, 6-3, 6-2 आशा तीन सेटमध्ये फक्त 1 तास आणि 45 मिनिटात पराभूत केले. तर दुसरीकडे 2021 च्या फ्रेंच ओपनचा गत उपविजेता तित्सिपासला डॅनिश किशोरवयीन होल्गेर रूनेने 7-5, 3-6, 6-3, 6-4 अशा सेटमध्ये पराभव केला. आता सिलिक रशियाच्या आंद्रे रूब्लेव्हशी भिडणार आहे. सिलिक तिसऱ्यांदा रोलँड गार्रोसच्या उपांत्यपूर्वी फेरीत प्रवेश केला आहे.

सिलिक या विजयानंतर म्हणाला की, 'माझ्या कारकिर्दितील ही एक सुंदर मॅच होती. सुरूवातीपासून शेवटपर्यंत सामना मजेदार झाला. गेल्या काही आठवड्यातील हे सर्वोत्तम टेनिस होते'. दुसरीकडे मॅद्वेदेवने गेल्या वर्षी पॅरिसमध्ये चांगली कामगिरी केली होती. तो उपांत्यपूर्व फेरीत पोहचला होता.

यंदाच्या स्पर्धेतही त्याने आतापर्यंत एकही सेट गमावला नव्हता. मात्र 33 वर्षाच्या सिलिकने आजच्या सामन्यात दमदार कामगिरी करत मेद्वेदेवचा तीन सेटमध्ये सहज पराभव केला. सिलिकने मेद्वेदेवची सर्व्ह पाचवेळा ब्रेक केली. मेद्वेदेवला एकही ब्रेक पॉईंड मिळवता आला नाही. रशियन टेनिसपटूवर क्रोएशियन टेनिसपटूला चार सामन्यात पहिल्यांदाच पराभूत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT