funniest Cricket Video Viral of European League Series Match in Czech Republic esakal
क्रीडा

चेक रिपब्लिकमध्ये असं क्रिकेट खेळलं जातं? Video होतोय तुफान व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या जमान्यात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेला किस्सा लगेचच व्हायरल होतो. असाच एक गंमतीशीर किस्सा युरोपमधील चेक रिपब्लिक (Czech Republic) देशात घडला. क्रिकेटचे उगमस्थान असलेल्या युरोपमधील चेक रिपब्लिक देशात युरोपियन लीग सिरीज (European League Series) सुरू होती. यावेळी स्टम्पिंगचा फसलेला प्रयत्न त्यानंतर धावबाद करण्याची दवडलेली संधी, या सर्वांचा परिपाक म्हणून एकाच चेंडूवर फलंदाजाच्या बॅटला चेंडू न लागता मिळालेल्या 3 धावा असा नाट्यमय प्रकार घडला. या सर्व नाट्यमय घडामोडींचा व्हिडिओ युरोपियन क्रिकेटच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

हा सामना विनोहर्ड क्रिकेट क्लब आणि प्राग बार्बेरियन्स यांच्यात झाला. या सामन्यावेळी विनोहार्डीच्या खेळाडूंनी गचाळ क्षेत्ररक्षणाचा उत्तम नमुना सादर केला. याचा फायदा उचलत प्रागच्या स्टम्पिंग होता होता वाचलेल्या फलंदाजांनी 3 धावा वसूल केल्या.

युरोपियन क्रिकेटने हा गंमतीशीर व्हिडिओ शेअर करत त्याला 'काहीही न करता त्यांनी तीन धावा चोरल्या.' असे कॅप्शन दिले. हा गंमतीशीर घटनाक्रम होत असताना समालोचन करणाऱ्यांनाही हासू आवरले नाही. प्राग बार्बेरियन्सने हा सामना 6 धावांनी जिंकला. खराब हवामानामुळे सामना प्रत्येकी 3 षटकांचा केला होता. प्राग बार्बेरियनने 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 24 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विनोहर्डला फक्त 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 18 धावा करता आल्या. ग्रुप बी मध्ये बार्बेरियन्स 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे तर विनोहर्ड 6 गुणांसह चौथ्या गुणांवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT