Gareth Southgate resigns as England manager after eight years sakal
क्रीडा

Gareth Southgate : पण आता बदल करण्याची वेळ आली आहे... असे सांगत साऊथगेट यांनी केले गुडबाय

Euro Cup 2024 : इंग्लिश फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक गेराथ साऊथगेट यांनी युरो स्पर्धेत अंतिम सामन्यात आलेल्या अपयशानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेली आठ वर्षे त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : इंग्लिश फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक गेराथ साऊथगेट यांनी युरो स्पर्धेत अंतिम सामन्यात आलेल्या अपयशानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेली आठ वर्षे त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघाने युरो स्पर्धेत अंतिम फेरी गाठली; मात्र रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने २-१ असा विजय मिळवला आणि इंग्लंड संघाचे स्वप्न धुळीस मिळाले. इंग्लिशमन असल्याचा मला अभिमान आहे. इंग्लंड संघाचा खेळाडू आणि त्यानंतर प्रशिक्षक राहण्याचा सन्मान मला मिळाले, हे माझे भाग्य आहे. माझ्यासाठी हे सर्वस्व होते; पण आता बदल करण्याची वेळ आली आहे, असे सांगत साऊथगेट यांनी गुडबाय केले.

इंग्लंड फुटबॉल संघटनेबरोबर असलेला साऊथगेट यांचा करार या वर्षात संपणार होता; परंतु त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत असतानाच त्यांनी हे पद सोडले. २०१६ मध्ये साऊथगेट यांनी इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारलो होते.

त्यानंतर सलग दोन युरो स्पर्धेत इंग्लंड संघाने अंतिम फेरी गाठली होती. २०१८ च्या विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला होता; परंतु १९६६ नंतर विश्वविजेतेपदाचा दुष्काळ इंग्लंड संघाला संपवता आलेला नाही. इंग्लंडने विजेतेपद मिळवले नाही, तर ही आपली अखेरची युरो स्पर्धा असेल, असे त्यांनी स्पर्धेअगोदर सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

SCROLL FOR NEXT