pakistan cricket board pakistan cricket board
क्रीडा

पाकिस्तानची विश्वचषकावर नजर? प्रशिक्षकपदी करणार या दिग्गजाची नियुक्ती!

सकाळ डिजिटल टीम

२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने षटकार हाणून भारताला विजय मिळवून दिला होता. या विजयासह भारताने तब्बल २८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वकरंडकावर आपले नाव कोरले होते. यावेळी कर्णधार धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टनची चांगलीच स्तुती झाली होती. मात्र, विश्वकरंडक जिंकून दिल्यानंतर कर्स्टन यांनी वैयक्‍तिक कारण पुढे करीत पदाचा राजीनामा दिला होता. आता कर्स्टनवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नजर गेली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला संघासाठी नवीन प्रशिक्षक हवा आहे. यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी अचानक राजीनामा दिला होता. यामुळे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन सध्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.

मात्र, विश्वचषक संपल्यानंतर त्यांना कायम प्रशिक्षक हवा आहे. यासाठी गॅरी कर्स्टनवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नजर आहे. प्रशिक्षकाच्या शर्यतीत सायमन कॅटिच आणि पीटर मूर्स हेही आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर सायमन कॅटिचने कोलकाता नाइट रायडर्सचे साहाय्यक प्रशिक्षक व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. दुसरीकडे पीटर मूर्स हे दोनवेळा इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहे. मूर्स यांनी नॉटिंगहॅमशायरसोबत नुकताच तीन वर्षांचा करार केला. मूर्स हे दोन वेगवेगळ्या संघांसह काउंटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणाऱ्या प्रशिक्षकांपैकी एक आहेत. आता पाकिस्तान कोणाची निवड करतो हेच पाहणे बाकी आहे.

अचानक दिला राजीनामा

मिसबाह-उल-हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी अचानक राजीनामा दिला. यामुळे त्यांची चांगलीच धावाधाव झाली. त्यामुळे पीसीबीने माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताकची वर्ल्डकपसाठी अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT