Gautam Gambhir Babar Azam esakal
क्रीडा

Gautam Gambhir Babar Azam : ज्या प्रकारचं तंत्र.... बाबर आझमबाबत सर्व संघांना गौतमचा 'गंभीर' इशारा

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir Babar Azam : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्डकपची सुरूवात होत आहे. सर्व 10 संघ भारतात पोहचले असून ते सराव सामने खेळत आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंवर, त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. यातील एक नाव म्हणजे बाबर आझम!

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विराट कोहली, रोहित शर्मा, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, जो रूट या दिग्गजांच्या मांदियाळीत आपले स्थान निर्माण केलं आहे. तो यंदा पहिल्यांदाच भारतात खेळणार आहे.

सराव सामन्यात त्याने दमदार फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली होती. आता याच बाबर आझमबाबत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने इतर संघाने अप्रत्यक्ष एक इशाराच दिला.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीर रोहित शर्माबद्दल बोलताना म्हणाला की, 'भारत यंदा मायदेशात वर्ल्डकप खेळणार आहे. रोहितकडे जी क्षमता आहे, त्याचे मायदेशातील रेकॉर्ड सर्वांना माहिती आहे. त्याने तीन ते चार द्विशतके ठोकली आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की तो चांगला खेळ करत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी उत्सुक असले.'

बाबर आझमबाबत बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, 'ज्या प्रकारचं त्याचं फलंदाजीचं तंत्र आहे ते पाहते मला वाटते की तो यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसाठी तीन ते चार शतके आरामात ठोकू शकेल.'

बाबर आझमने न्यूझीलंडविरूद्धच्या सराव सामन्यात 80 धावांची खेळी केली होती. पाकिस्तानने 300 पेक्षा जास्त धावांचे टार्गेट न्यूझीलंडसमोर ठेवले होते. मात्र गेल्या वर्ल्डकपचे उपविजेते न्यूझीलंडने हे आव्हान 38 चेंडू राखून पार केले.

पाकिस्तानला भारतीय उपखंडात खेळण्याचा चांगला अनुभव आहे. मात्र न्यूझीलंडविरूद्धच्या सराव सामन्यानंतर त्यांच्याच चिंतेत भर पडली आहे. भारतातील खेळपट्ट्या पाकिस्तानपेक्षा फार वेगळ्या नाहीयेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

India Squad for T20 World Cup 2026: संजू-अभिषेक ओपनिंगला, रिंकू सिंग फिनिशर; वर्ल्ड कपसाठी भारताची तगडी Playing XI, थरथर कापतील प्रतिस्पर्धी...

झी मराठीची मोठी घोषणा! पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार वाहिनीवरील दोन गाजलेल्या मालिका; वाचा तारीख आणि वेळ

नवीन वर्षात स्लिम व्हायचं स्वप्न? वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या 10 गोल्डन टिप्स

Nashik Municipal Election : भाजपचा 'मिशन १०० प्लस'चा प्लॅन; नाशिकमध्ये उमेदवारीसाठी आता त्रिस्तरीय सर्वेक्षण सुरू!

SCROLL FOR NEXT