Gautam Gambhir 
क्रीडा

Gautam Gambhir : 'खोटारडेपणा...'; अश्लील कृतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गंभीरचे स्पष्टीकरण

Kiran Mahanavar

Gautam Gambhir : भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर या व्हिडिओमध्ये भारत विरुद्ध नेपाळ सामन्यादरम्यान गौतम गंभीरने कोहली-कोहलीचा नारा देणाऱ्या प्रेक्षकांना मधले बोट दाखवले.

माजी भारतीय क्रिकेटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यासोबत त्याच्यावर बरीच टीका झाली. मात्र आता गौतम गंभीरने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्याने हे देखील सांगितले की काय आहे संपूर्ण प्रकरण?

या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना गौतम गंभीर म्हणाला की, सोशल मीडियावर जे दाखवले जाते त्यात तथ्य नाही कारण लोक त्यांना जे दाखवायचे ते दाखवतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये काही सत्य नाही. जर तुम्ही भारतविरोधी घोषणा दिल्या आणि काश्मीरबद्दल बोललात तर तुमच्या समोरचा व्यक्ती प्रतिक्रिया देईल, हसत नाही आणि निघून जाईल. तिथे 2-3 पाकिस्तानी होते जे काश्मीरवर भारतविरोधी काही गोष्टी बोलत होते. त्यामुळे ते माझे स्वाभाविक होते. माझ्या देशाविरुद्ध कोणी घोषणा दिल्यास मी नक्कीच प्रत्युत्तर देईन.

मात्र, गौतम गंभीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला गौतम गंभीरचा हा व्हिडिओ भारत विरुद्ध नेपाळ सामन्यादरम्यानचा आहे. मिडल फिंगरच्या व्हिडिओनंतर गौतम गंभीरवर बरीच टीका होत आहे. आता या व्हायरल व्हिडिओवर त्याने स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT