Gautam Gambhir picks his top 3 Indian batsman for T20 World Cup not Included Virat Kohli KL Rahul esakal
क्रीडा

T20 World Cup : गंभीरच्या 'टॉप ऑर्डर'मध्ये नाहीत राहुल, विराट

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : यंदाचा आयसीसी टी 20 वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होणार आहे. वर्ल्डकप सुरू होण्यासाठी काही महिनेच शिल्लक असल्यामुळे सर्व संघांनी आपल्या संघ बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. या दृष्टीकोणातूनच दक्षिण आफ्रिकेविरूद्धची पाच टी 20 सामन्यांची मालिका संघबांधणीसाठी महत्त्वाची आहे. या मालिकेत भारत आयपीएलमधील काही दर्जेदार खेळाडूंना आजमावून देखील पाहत आहे.

दरम्यान, भारताच्या माजी खेळाडूंनी त्यांच्या दृष्टीकोणातून संघरचना कशी हवी याबाबत आपली मते व्यक्त करत आहेत. भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने देखील टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनबद्दल आपले मत व्यक्त केले. (Gautam Gambhir picks his top 3 Indian batsman for T20 World Cup)

गौतम गंभीरने टी 20 वर्ल्डकपसाठी आपल्या पसंतीच्या पहिल्या तीन फलंदाजांची नावे सांगितली. विशेष म्हणजे या तीन नावात आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या केएल राहुल (KL Rahul) आणि रन मशिन विराट कोहलीचे (Virat Kohli) नावच नाहीये.

गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'भारताच्या डावाची सुरूवात कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी करावी. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या जागी सूर्यकुमार यादवने फलंदाजी करावी असेही गंभीरने सुचवले.

गौतम गंभीरने पहिल्या तीन फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि केएल राहुल यांचा समावेश केलेला नाही त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. नुकत्याच संपलेल्या आयपीएल हंगामात केएल राहुल सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. त्याने 15 सामन्यात 616 धावा केल्या आहेत. असे असतानाही गंभीरने वर्ल्ड कपसाठीच्या पहिल्या तीन फलंदाजात त्याचा समावेश केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT