glenn maxwell century australia t20 series win beat west indies by 34 runs Sakal
क्रीडा

AUS vs WI : ग्लेन मॅक्सवेलचा शतकी झंझावात; ऑस्ट्रेलियाचा ‘टी-२०’ मालिका विजय; वेस्ट इंडीजवर ३४ धावांनी मात

ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी झंझावाताच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने येथे पार पडलेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत वेस्ट इंडीज संघावर ३४ धावांनी मात केली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

सकाळ वृत्तसेवा

ॲडलेड : ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी झंझावाताच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने येथे पार पडलेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत वेस्ट इंडीज संघावर ३४ धावांनी मात केली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. अवघ्या ५५ चेंडूंमध्ये नाबाद १२० धावांची खेळी साकारणारा ग्लेन मॅक्सवेल सामनावीर ठरला.

ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडीजसमोर २४२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. वेस्ट इंडीजला मात्र २० षटकांत ९ बाद २०७ धावाच करता आल्या. कर्णधार रोवमन पॉवेल याने ३६ चेंडूंमध्ये पाच चौकार व चार षटकारांसह ६३ धावांची खेळी साकारत कडवी झुंज दिली. आंद्रे रस्सेलने ३७ धावांची आणि जेसन होल्डरने नाबाद २८ धावांची खेळी केली, पण त्यांनाही वेस्ट इंडीजला विजय मिळवून देता आला नाही. वेस्ट इंडीजला ९ बाद २०७ धावांपर्यंत मजल मारता आली.

वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेल याने ५५ चेंडूंमध्ये नाबाद १२० धावांची तुफानी खेळी साकारली. त्याने आपली खेळी १२ चौकार व ८ षटकारांनी सजवली. मॅक्सवेलने या शतकासोबतच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील रोहित शर्माच्या सर्वाधिक पाच शतकांच्या विक्रमाचीही बरोबरी साधली. आता मॅक्सवेल व रोहित यांनी प्रत्येकी पाच शतके झळकावली आहेत.

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया- २० षटकांत ४ बाद २४१ धावा (डेव्हिड वॉर्नर २२, मिचेल मार्श २९, ग्लेन मॅक्सवेल नाबाद १२० - चेंडू ५५, चौकार १२, षटकार ८, मार्कस स्टॉयनिस १६, टीम डेव्हिड नाबाद ३१, जेसन होल्डर २/४२) विजयी वि. वेस्ट इंडीज २० षटकांत ९ बाद २०७ धावा (जॉन्सन चार्ल्स २४, निकोलस पूरण १८, रोवमन पॉवेल ६३, आंद्रे रस्सेल ३७, जेसन होल्डर नाबाद २८, मार्कस स्टॉयनिस ३/३६, जॉश हॅझलवूड २/३१, स्पेन्सर जॉन्सन २/३९).

टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक शतके

  • ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) - ५

  • रोहित शर्मा (भारत) - ५

  • सूर्यकुमार यादव (भारत) - ४

  • एस. डेव्हिझी (झेक प्रजासत्ताक) - ३

  • सी. मुनरो (न्यूझीलंड) - ३

  • बाबर आझम (पाकिस्तान) - ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT