Glenn Maxwell T20 Record esakal
क्रीडा

Glenn Maxwell T20 Record : 47 चेंडू 100! मॅक्सवेलच्या शतकानं हिटमॅनचं रेकॉर्ड आलं धोक्यात

अनिरुद्ध संकपाळ

Glenn Maxwell T20 Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचे 223 धावांचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत नाबाद 104 धावा ठोकल्या. मॅक्सवेल सोडला तर फक्त ट्रॅविस हेडने 35 तर कर्णधार मॅथ्यू वेडने 16 चेंडूत 28 धावा केल्या.

भारताचा मालिका विजयाचा घास एकट्या मॅक्सवेलने हिसकावून घेतला. मॅक्सवेलच्या या शतकी खेळीने अनेक विक्रमांशी बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या फिंच आणि इंग्लिसच्या विक्रमाशी मॅक्सवेलने बरोबरी केली. याचबरोबर मॅक्सवेलने रोहितच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) हा टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 4 शतकी खेळी केल्या आहेत. आता मॅक्सवेलने देखील रोहितच्या विक्रमाशी बरोबरी केली. मॅक्सवेलचे हे टी 20 क्रिकेटमधील चौथे शतक असून भारताविरूद्धचे हे दुसरे शतक आहे. त्याने 2019 मध्ये बंगळुरू येथे भारातविरूद्ध शतक ठोकले होते. त्यावेळी देखील कांगारूंनी चेस करत भारताचा पराभव केला होता.

ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) याच महिन्यात वनडे वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान शतक ठोकले होते. आजच्या सामन्यात मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. तरी देखील कांगारूंनी विजयासाठी शेवटच्या दोन षटकात 47 धावांची गरज होती.

अक्षर पटेलने 19 व्या षटकात 26 धावा दिल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात प्रसिद्ध कृष्णाला 21 धावा वाचवायच्या होत्या. मात्र मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेलच्या धाडाक्यापुढे हे आव्हान देखील खुजे ठरले. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवत मालिका जिवंत ठेवली आहे. आता मालिका विजयासाठी भारतीय संघाला रायपूर येथे होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

Gadchiroli News: विमानतळ आणि MIDC साठी जमीन संपादनाला विरोध; गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी मनसेकडे मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT