GM praggnanandhaa once again defeated chess world champion Magnus Carlsen in ftx crypto cup  
क्रीडा

17 वर्षाच्या प्रज्ञानंदाने 6 महिन्यांत तिसऱ्यांदा जगज्जेत्या कार्लसनला नमवलं

सकाळ डिजिटल टीम

17 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदा (Rameshbabu Praggnanandhaa) ने मियामी येथे सुरू असलेल्या FTX क्रिप्टो कपमध्ये पाच वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन असलेल्या मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) चा पराभव केला. मागील सहा महिन्यांत त्यांने तिसऱ्यांदा विश्वविजेत्या कार्लसनचा पराभव केला आहे. ने कार्लसनला ब्लिट्झ टायब्रेकमध्ये पराभूत केले. मात्र, या विजयानंतरही कार्लसनने अधिक गुणांमुळे एफटीएक्स क्रिप्टो कप विजेतेपद पटकावले. तर प्रज्ञानंदा हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

प्रज्ञानंदाने कार्लसनकडून सलग तीन गेम जिंकले, त्यात टायब्रेकमधील दोन गेमचा समावेश होता. कार्लसन आणि प्रग्नंदा यांच्यातील पहिले दोन सामने अनिर्णित राहिले. कार्लसनने तिसरा गेम जिंकला पण भारतीय खेळाडू प्रज्ञानंदाने हार न मानता चौथा गेम जिंकून सामना टायब्रेकरवर खेचला. यानंतर टायब्रेकरमध्ये दोन्ही गेम जिंकून भारतीय खेळाडूने कार्लसनला चकित केले.

कार्लसनवर विजय मिळवूनही भारताच्या 17 वर्षीय प्रज्ञानंदाने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. नॉर्वेचा खेळाडू पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने सर्वाधिक गुण मिळवत विजेतेपद पटकावले. त्याने एकूण 16 गुण मिळवले तर प्रज्ञानानंदने 15 गुणांसह दुसरे स्थान मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT