Former Captain Subhash Kangralkar Passed Away
Former Captain Subhash Kangralkar Passed Away esakal
क्रीडा

Ranji Cricket Team : क्रिकेट विश्वावर शोककळा! माजी रणजीपटूचं वयाच्या 74 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गोवा क्रिकेट संघटना आणि एमसीएचे देखील सदस्यपद त्यांनी भूषवले होते.

बेळगाव : बेळगावचे सुपुत्र आणि गोवा रणजी क्रिकेट संघाचे (Ranji Cricket Team) माजी कर्णधार सुभाष कंग्राळकर (वय ७४) यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. तानाजी गल्लीचे रहिवाशी व गोवा कर्मभूमी होती. सोमवारी दुपारी १२: ३० वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

याप्रसंगी बेळगाव स्पोर्टस्‌ क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, माजी क्रिकेटपटू शिवाजी जाधव, माजी महापौर मालोजी अष्टेकर, गोवा मराठा संघटनेचे सदस्य दळवी यांनी कंग्राळकर (Subhash Kangralkar) यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल मनोगत व्यक्त केले. बेळगावकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली. कंग्राळकर यांच्या मागे विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. याप्रसंगी चौगुले उद्योग समूहाचे उद्योजक सतीश चौगुले उपस्थित होते.

गोवा क्रिकेटला मोठे योगदान

कंग्राळकर यांनी गोवा रणजी संघाचे (Goa Ranji Team) कर्णधारपद भूषवित अनेक निर्णायक सामने जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गोवा क्रिकेट संघटना आणि एमसीएचे देखील सदस्यपद त्यांनी भूषवले होते. बेळगाव आणि गोव्यात ते प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून परिचित होते. त्यांनी बेळगावच्या गोगो संघातून फलंदाजी करताना अनेकदा अव्वल कामगिरी केली.

अनेक रणजी सामन्यातून त्यांनी सामना अधिकारी म्हणूनही काम केल. गोवा रणजी क्रिकेट संघाचे ते कर्णधार होते. तसेच क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने विश्व कप जिंकलेल्या संघाच्या निवडीचे दक्षिण विभागीय निवड कमिटीचे प्रमुख सदस्य होते.

अंतिम सामना लांबणीवर

कंग्राळकर यांच्या निधनाची बातमी समजताच युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट टी-ट्वेंटी लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील आजचा अंतिम सामना तहकूब करून कंग्राळकर यांना श्रद्धांजली वाहिली. अंतिम सामना एक दिवस लांबणीवर टाकण्यात आला. आता हा सामना मंगळवारी (ता. १६) सकाळी १०.३० वाजता साईराज वॉरियर्स व रोहन ट्रेडर्स यांच्यात होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT