Golden Boy Lakshya Sen wins Commonwealth Games 2022 gold medal 
क्रीडा

Lakshya Sen: दीपिका पदुकोनच्या वडिलांमुळे भारताला सापडला गोल्डन बॉय लक्ष्य सेन

राष्ट्रकुल स्पर्धेत लक्ष्य सेनने पहिल्याच प्रयत्नात सुवर्ण पदकाला गवसणी घातली

Kiran Mahanavar

Lakshya Sen Badminton CWG 2022 : भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी देखील सुवर्ण धडाका कायम ठेवला. लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये पुरूष एकेरीत सुवर्ण पदक जिंकले. याँगने किदाम्बी श्रीकांतला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि लक्ष्यने आता आपल्या भारतीय सहकाऱ्याचा बदला घेतला आहे. लक्ष्य सेन पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत आहे आणि पहिल्याच प्रयत्नात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

10 वर्षापासून लक्ष्य सेन प्रकाश पदुकोन बॅडमिंटन अकॅडमीत सराव करत होता. तेव्हाच प्रकाश पदुकोन यांनी त्याची प्रतिभा ओळखली. आता 10 वर्षांनी लक्ष्य सेनने वयाच्या 20 व्या वर्षी बॅडमिंटन पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या ची याँग एनजीचा 21 -19, 9 -21, 16 - 21 अशा तीन गेममध्ये पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

लक्ष्य सेन मलेशियाच्या याँग एनजी याच्याविरूद्ध पहिल्या गेममध्ये सुरूवातीला पिछाडीवर पडला . पहिल्या सेटमध्ये याँगने 19-21 ने गेम जिंकत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यनं जबरदस्त पुनरागमन करत एकतर्फी विजय मिळवत 21-9 ने गेम जिंकत सामन्यात 1-1 ची आघाडी घेतली. खेरचा निर्णयाक गेममध्ये लक्ष्यनं 21 गुण पूर्ण करत सेट आणि सामना जिकंत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : मराठा आंदोलक जरांगे पाटील बैठकीसाठी बीडला रवाना

SCROLL FOR NEXT