Google Gemini branding showcased during an IPL match, highlighting the AI-powered partnership aimed at enhancing fan engagement and digital experiences.
esakal
Google Gemini Joins IPL as AI Partner भारत सरकारच्या नवीन कायद्यानंतर, ड्रीम-11 आणि माय-11 सर्कलने आयपीएलमधून माघार घेतली, ज्यामुळे बीसीसीआयला मोठे नुकसान झाले. कारण, बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान भरून काढण्याचा मार्ग शोधत असतानाच, गुगलने आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे बीसीसीआयला आता एकप्राकरे लॉटरीच लागणार असल्याचे दिसत आहे. कारण, यामुळे बोर्ड एकाच हंगामात करोडो रुपये कमवू शकणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगल जेमिनी पुढील तीन हंगामांसाठी आयपीएलमध्ये सामील होणार आहे. बीसीसीआय लवकरच या भागीदारीची घोषणा करू शकते. एआय आता क्रिकेटच्या जगातही स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. म्हणूनच ते सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलमध्ये प्रवेश करू इच्छित आहे.
याआधी ‘चॅट जीपीटी’ने वुमेन्स प्रीमियर लीग २०२६मध्ये भागीदारी केली होती. हा करार बोर्डाने दोन वर्षांसाठी १६ कोटी रुपयांना केला होता. ड्रीम 11 टीम इंडियाचे जर्सी स्पॉन्सर होते. त्यांनी माघार घेतल्यानंतर, अनेक कंपन्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेवटी हा करार शेवटी अपोलो टायर्सकडे गेला, ज्यांनी ५५४ कोटी दिले होते.
एआय सातत्याने पुढे पुढे जात आहे. अशावेळी त्यांचे उद्दिष्ट भारतामधील १.४ अब्ज लोकसंख्येवर प्रभाव टाकण्याचे आहे. म्हणूनच एआय कंपन्यांचे लक्ष भारतावर आहे. या प्रमुख कंपन्यांचा असाही विश्वास असल्याचे दिसत आहे आहे की, क्रिकेट हा भारतात प्रवेश करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि म्हणूनच हे करार केले जात आहेत. शिवाय अशीही शक्यता आहे की, बीसीसीआय भविष्यात आणखी अनेक मोठे करार करू शकते.