महिला सेलिंगपटू नेत्रा कुमाननची स्पेनमध्ये विजयी पताका sakal media
क्रीडा

महिला सेलिंगपटू नेत्रा कुमाननची स्पेनमध्ये विजयी पताका

भारताची महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानन हिने स्पेनमधील सेलिंग चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताची महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानन हिने स्पेनमधील सेलिंग चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. नेत्रा कुमानन हिने ग्रॅन कनारिया सेलिंग चॅम्पियनशिपमधील रेसर रेडीयल प्रकारात सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली.

टोकियो ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवणारी नेत्रा कुमानन ही भारताची पहिलीच महिला सेलिंगपटू ठरली आहे. स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तीन देशांतील २० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. नेत्रा कुमानन हिने तीन शर्यतींमध्ये बाजी मारली. तसेच अखेरच्या दोन शर्यतींमध्ये तिने अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला.

दरम्यान, याआधी पार पडलेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये नेत्रा कुमानन हिला आपला ठसा उमटवता आला नव्हता. ४४ खेळाडूंमधून तिला ३५व्या स्थानावरच समाधान मानावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT