Pele Health Update
Pele Health Update  esakal
क्रीडा

Pele Health Update : द ग्रेट पेले यांची प्रकृती खालावली; उपचारांना देत आहेत कमी प्रतिसाद

अनिरुद्ध संकपाळ

Pele Health Update : एकीकडे संपूर्ण फुटबॉल जगत कतारमध्ये वर्ल्डकपचा आनंद घेत असताना दुसरीकडे ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच केमो थेरपीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या मुलीने कोणताही काळजी करण्याची गोष्ट नसल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांची प्रकृती ढासळी असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार पेले केमो थेरपीला प्रतिसाद देत नाहीयेत. त्यामुळे त्यांना palliative care मध्ये हवलण्यात आले आहे.

पेले यांना त्यांच्या कॅन्सरवरील उपचाराचे मुल्यमापन करण्यासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या छातीत संसर्ग झाल्याचे निदान झाले. पेले यांच्या मोठ्या आतड्यातून 2021 मध्ये ट्यूमर काढण्यात आला होता. तेव्हापासून ते सातत्याने रूग्णालयात दाखल होत आहेत.

फोलहा दे सेंट पाऊलोने दिलेल्या वृत्तानुसार पेले यांची केमो थेरपी बंद करण्यात आली आहे. त्यांना palliative care मध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये पेलेंवर फक्त लक्षणांवर उपचार केले जातील. म्हणजे त्यांच्या वेदना आणि श्वास घेताना होणाऱ्या त्रासावर उपचार करण्यात येणार आहे. शुक्रवारी ब्राझीलमधून आलेल्या वृत्तानुसार पेले हे अँटीबायोटिक्स उपचारांना प्रतिसाद देत होते आणि त्यांची प्रकृती स्थीर होती. त्यांच्या प्रकृतीत किंचीत सुधारणा देखील झाली होती.

पेले यांनी स्वतः आपल्या प्रकृतीबद्दल माहिती देतना महिन्याच्या रूटीन चेकअपसाठी आलो असल्याचे सांगितले होते. याचबरोबर जगभरातून त्यांना मिळालेल्या सकारात्मक संदेश पाहून त्यांना चांगले वाटत असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांनी इनस्टाग्रामवर पोस्ट केली होती की, 'मित्रांनो मी महिन्याच्या रूटीन चेकअपसाठी रूग्णलयात दाखल झालो आहे. तुमच्याकडून मिळणाऱ्या सकारात्मक संदेशांमुळे मला कायमच आनंद होतो. कतारने दिलेल्या या मानवंदेनेसाठी आभार. ज्यांनी मला सकारात्मक उर्जा दिली त्यांचेही आभार.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Chhetri : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने अचानक केली निवृत्तीची घोषणा

Jr NTR: ज्युनियर एनटीआरचं होतंय कौतुक; वाढदिवसाच्या आधी इतके पैसे मंदिराला केले दान

Unemployment Rate: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरांमधील बेरोजगारीचा दर वाढला; पण महिलांची स्थिती सुधारली

Virat Kohli On Retirement : 'माझं काम संपेल, मी निघून जाईन...' विराट कोहलीने निवृत्तीवर केलं मोठं विधान

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT