Indian women hockey team creates history at the Tokyo Olympics by entering the semifinals for the first time
Indian women hockey team creates history at the Tokyo Olympics by entering the semifinals for the first time  
क्रीडा

महिला हॉकी संघाला घर, कार देण्याचा हिरे व्यावसायिकाचा शब्द

दीनानाथ परब

अहमदाबाद: गुजरातमधील प्रसिद्ध हिरे व्यावसायिक (Diamond Merchant) सावजी ढोलकिया (Savji Dholakia) यांनी भारतीय महिला हॉकी संघातील (womens Hockey team) खेळाडूंना घर बांधणीसाठी (home) ११ लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. सावजी ढोलकिया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये महागड्या भेटवस्तू देण्यासाठी ओळखले जातात. महिला हॉकी संघातील ज्या खेळाडूंना घर बांधायचे आहे, त्यांना ११ लाखापर्यंत कंपनीकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा सावजी ढोलकिया यांनी केली आहे.

महिला हॉकी संघाने पदक विजेती कामगिरी केली तर टीममधील अन्य सदस्यांना पाच लाखापर्यंत नवी कोरी कार देण्याचाही त्यांनी शब्द दिला आहे. मंगळवारी भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला. पण उपांत्यफेरीत अर्जेंटिनाकडून २-१ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले.

आता ब्राँझ मेडलच्या सामन्यात भारताची लढत ग्रेट ब्रिटन विरुद्ध होणार आहे. "मला मनापासून खूप अभिमान वाटतोय. या निमित्ताने मी जाहीर करतो की, एचके ग्रुपने महिला हॉकी संघाला सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या खेळाडूंना घर बांधायचे आहे, त्यांना ११ लाखाची आर्थिक मदत दिली जाईल. टोक्यामध्ये भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. आमच्याकडून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे" असे सावजी ढोलकिया यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT