Sachin Tendulkar sakal
क्रीडा

Guru Purnima 2023 : ...तर तो एक रुपया सचिनचा!

धनश्री ओतारी

गुरू रमाकांत आचरेकर सरांनी सचिन तेंडुलकरला घडवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. सचिनला शारदाश्रम शाळेत असल्यापासून आचरेकर सरांनी क्रिकेटचे धडे दिले. शारदाश्रम शाळा सुटली की सचिन काका-काकूंकडे जायचा. जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन खेळण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायचा. असाच एक किस्सा गुरूपोर्णिमेनिमत्त चर्चेत आला आहे.(achrekar sir teaching sachin tendulkar)

आचरेकर सर कोच म्हणून कार्यरत होण्यापूर्वी स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू होते. मुंबई आणि इतर ठिकाणच्या प्रतिभेला हेरून त्याला पैलू पाडायचे काम ते मोठ्या आवडीने करीत. अशातच त्यांना सचिन तेंडुलकर भेटला. अकरा वर्षांचा झाल्यावर क्रिकेटची आवड बघून त्याच्या भावाने, अजितने त्याला आचरेकर सरांकडे सोपवला.

त्यावेळी आचरेकर सर शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत अधिकृत क्रिकेट कोच होते. सचिनची शाळा वेगळी होती पण आचरेकर सर त्याचा खेळ पाहून प्रभावित झाले आणि त्याचे ऍडमिशन शारदाश्रम मध्ये करायला लावले. दोघे कित्येक तास शिवाजी पार्क मैदानावर एकत्र घालवत असत. आचरेकर सर सचिनला वेगवेगळ्या मैदानावर, वेगवेगळ्या संघासोबत खेळायला लावत.

कित्येक तासांच्या अथक सरावानंतर जेव्हा मी अतिशय थकायचो तेव्हा सर मला ग्राउंडवर पळायला सांगायचे. यामुळे पुढील आयुष्यात खेळताना कधी थकवा जाणवलाच नाही अशी भावना सचिनने व्यक्त केली होती.

...तर तो एक रुपया सचिनचा!

आचरेकर सरांकडे आणखी एक टेक्निक होती. ज्यावेळी सचिन बॅटिंग करून करून कंटाळायचा त्यावेळी सर मधल्या स्टंपवर एक रुपयाचे नाणे ठेवायचे आणि टीमला चॅलेंज द्यायचे. जो बॉलर हे नाणे पाडून दाखवेल त्याला तो एक रुपया बक्षीस. आणि समजा कुणीच पाडू शकलं नाही तर तो एक रुपया सचिनचा.

ते पाहून सचिनबरोबरचे इतर सहकारी गोलंदाज सचिनची विकेट घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे. मात्र सचिन इर्षेला पेटून न हारण्यासाठी खेळायचा.त्यावेळी जमवलेली ती नाणी सचिनने अजूनही जपून ठेवली आहेत. नंतर मिळालेल्या कुठल्याही पुरस्कारापेक्षा ती नाणी त्याला जास्त महत्वाची वाटतात. मी त्या नाण्यामुळे कठीण परिस्थितीत जास्त मेहनत करायला आणि स्पर्धात्मक खेळायला शिकलो अशी भावनाही सचिनने एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केली होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT