Hackers put Krunal Pandya Twitter account to sell for Bitcoins  esakal
क्रीडा

हॅकरने कृणाल पांड्याचे ट्विटर अकाऊंट काढले विक्रीला

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याचे (Krunal Pandya) ट्विटर अकाऊंट आज सकाळी ( दि. २७ ) हॅक झाले होते. हॅकरनी कृणाल पांड्याचे ट्विटर अकाऊंट बिटकॉईन्ससाठी ( Bitcoins) विक्रीला देखील काढले. याचबरोबर हॅकरनले (Hacker) या ट्विटर अकाऊंटवर काही आक्षेपार्ह कमेंट देखील केल्या. हॅकरने कृणाल पांड्याच्या ट्विटर अकाऊंटवरून जवळपास १० ट्विट केले होते. (Krunal Pandya Twitter account Hack)

गेल्या काही वर्षापासून अनेक क्रिकेटपटूंची सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सनचे (Shane Watson) ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. याचबरोबर भारताचा माजी विकेटकिपर पार्थिव पटेलने (Parthiv Patel) देखील हॅकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या पोस्टकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते.

कृणाल पांड्या संध्या आयपीएल २०२२ (IPL 2022) ची तयारी करत आहे. मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केले नसल्याने तो आता मेगा ऑक्शनमध्ये बोली लागण्याच्या प्रतिक्षेत असणार आहे. कृणाल पांड्याने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर मुंबईने त्याला २०१८ मध्ये ८.८ कोटी रूपये देऊन रिटेन केले होते. कृणाल पांड्याने आयपीएल २०२२ च्या लिलावासाठी (IPL 2022 Auction) आपले बेस प्राईस २ कोटी ठेवली आहे.

दरम्यान, त्याचा भाऊ हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) अहमदाबाद संघाने १५ कोटी रूपये देऊन आपल्या गोटात खेचले आहे. पांड्या अहमदाबादच्या संघाचे नेतृत्व देखील करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT