Asian Games 10 Meter Air Pistol eSakal
क्रीडा

Asian Games : आणखी एक सुवर्णवेध! 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताने जिंकलं गोल्ड मेडल

10 Meter Air Pistol : सांघिक क्रीडाप्रकारात सरबजोत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिवा नरवाल या तिघांनी गोल्ड मेडल जिंकलं आहे.

Sudesh

चीनमध्ये होत असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेमध्ये भारताची पदकांची लयलूट सुरूच आहे. आता 10 मीटर एअर पिस्टल क्रीडाप्रकारात पुरूषांच्या टीमने सुवर्ण कामगिरी केली आहे. सांघिक क्रीडाप्रकारात सरबजोत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिवा नरवाल या तिघांनी गोल्ड मेडल जिंकलं आहे.

आजच्या दिवसाची सुरुवातच भारताने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवत केली आहे. थोड्याच वेळापूर्वी भारताच्या रोशिबिना देवी हिने वुशू क्रीडाप्रकारात रौप्य पदक मिळवलंं होतं.

वैयक्तिक पदकांकडे लक्ष

10 मीटर एअर पिस्टल या सांघिक क्रीडाप्रकारात भारताच्या टीमने सुवर्णपदक मिळवलं आहे. यामध्ये सरबजोत आणि अर्जुन यांनी अनुक्रमे पाचवा आणि आठवा क्रमांक पटकावला. यामुळे हे दोघेही वैयक्तिक शूटिंगमध्ये अंतिम फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे आता या दोघांनाही वैयक्तिक क्रीडाप्रकारात पदक मिळण्याची आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT