Hanuma Vihari or Rohit Sharma who will get place in playing IX for 1st test against Windies  
क्रीडा

INDvsWI : असेल तो रोहित कितीही भारी पण, अंतिम संघात विहारीच

वृत्तसंस्था

ऍंटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने सलामीसाठी लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांना कोणताही बॅकअप न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचमुळे मधल्या फळीत रोहित शर्मा की हनुमा विहारी असा प्रश्न आता भारतीय संघाला पडणार आहे. 

''संघ कोणत्या समीकरणासह खेळत आहे यावर विहारी आणि रोहित यांच्यापैकी कोणाला स्थान मिळेल हे ठरेल. विहारीने दोन्ही अवघड मालिकांमध्ये संघासाठी चांगली फलंदाजी केली आहे. तसेच रोहितनेही मेलबर्नमध्ये चांगली कामगिरी केली आहे,'' अशा शब्दांत कोहलीने दोघांचे कौतुक केले. 

पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळावी? नोंदवा तुमचे मत :

''फलंदाजीसोबतच विहारी कोही षटकेही टाकू शकतो. रोहितचे कौशल्य आपण बरेच दिवस पाहात आलो आहोत. त्यामुळे अंतिम संघात जो सर्वाधिक समतोल आणेल त्यालाच संघात स्थान दिले जाणार,'' असे मत कोहलीने व्यक्त केले आहे. मात्र, कोहलीच्या या वक्तव्यावरुन रोहितला अंतिम संघात स्थान मिळण्याची संधी खूप कमी आहे. कोहली हनुमा विहारीलाच संधी देण्याची जास्त शक्यता आहे. 

सर रिचर्डस मैदानाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना साजेशी अशी तयार करण्यात आली असून, उसळणाऱ्या चेंडूंसमोर भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे अशी भारतीय फलंदाजी वरकरणी ताकदवान दिसत असली, तरी त्यांना ही ताकद मैदानावर दाखवावी लागणार आहे. अशाच खेळपट्टयांवर इंग्लंडला येथे 1-2 अशी मालिका गमवावी लागली होती हे भारतीय संघाला विसरून चालणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT