Harbhajan Sigh Take Oath As Rajya Sabha Member In Monsoon session of Parliament esakal
क्रीडा

VIDEO : 'आप'चा खासदार हरभजनची 'राज्यसभा' इनिंग सुरू

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगची (Harbhajan Sigh) राजकीय इनिंग सुरू झाली आहे. हरभजनने क्रिकेटमधून अधिकृतरित्या निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश करण्यासाठी फार वेळ लावला नाही. आम आदमी पक्षाकडून त्याला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर तो निवडून (Member of Parliament in Rajya Sabha) देखील आला. आज 18 जुलैला संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी त्याने राज्यसभेचा खासदार म्हणून शपथ घेतली. यानंतर त्याने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला.

सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवशेन (Monsoon session of Parliament) सुरू झाले. सत्राच्या पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्षांचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांना शपथ देण्यात आली. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि पीयूष गोयल यांच्याह राज्यसभेच्या 27 सदस्यांनी आज देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या सदस्यपदाची शपथ देण्यात आली. यात हरभजन सिंगचाही समावेश होता.

हरभजन सिंहने पंजाबी अस्मिता जपत आपली शपथ पंजाबी भाषेतून घेतली. यानंतर त्याने आपण राज्यसभेची शपथ घेतल्याचे ट्विटद्वारे आपल्या चाहत्यांना सांगितले. हरभजनने ट्विट केले की, 'आज राज्यसभा सदस्य या नात्याने संविधान, कायदा शासन आणि सभागृहाच्या गरिमेचे रक्षण करण्याची शपथ घेतली. मी पंजाब आणि देशाच्या जनतेसाठी पूर्ण निष्ठेने काम करेन. जय हिंद, जय भारत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT