Harbhajan Singh Predicts Playing XI Of India vs Pakistan ESAKAL
क्रीडा

India vs Pakistan : हरभजनच्या मते पाकिस्तानविरूद्ध 'ही' असले प्लेईंग 11; दोन दिग्गजांना डच्चू

अनिरुद्ध संकपाळ

Harbhajan Singh Predicts Playing XI Of India vs Pakistan : भारताचा माजी फिरकीपटू आणि राज्यसभेचा खासदार हरभजन सिंगने भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी 20 वर्ल्डकपमध्ये होणाऱ्या पहिल्या भारताची प्लेईंग 11 निवडली आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजनने आपली प्लेईंग 11 जाहीर केली. विशेष म्हणजे हरभजनने आपल्या प्लेईंग 11 मध्ये हर्षल पटेल, आर. अश्विन आणि ऋषभ पंत यांना स्थान दिलेले नाही.

हरभजन सिंग आपल्या प्लेईंग 11 बद्दल म्हणाला की, माझ्या मते हर्षल, दीपक हुड्डा आणि अश्विनला संघात स्थान मिळणार नाही. पाकिस्तानविरूद्ध भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजीचा विभाग सांभाळतील. तर अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल फिरकीची धुरा खांद्यावर घेतली. संघात दिनेश कार्तिकला संधी दिली जाईल.

हरभजनने आपली म्हणणे मांडताना सांगितले की, 'भारताची प्लेईंग 11 सोपी असेल. संघात फार बदल केले जाणार नाहीत. अर्शदीप सिंग, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव प्लेईंग 11 चा भाग निश्चित असतील. हरभजनच्या मते भारतीय संघ संतुलित आहे. नक्कीत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल. हरभजन म्हणाला की, जसप्रीत बुमराहचे संघात नसणे नक्कीच संघावर परिणाम करेल. मात्र बुमराहची उणीव मोहम्मद शमी भासू देणार नाही. तो त्याची जागा घेण्यास सक्षम आहे.

मोहम्मद शमीला दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी वर्ल्डकपच्या संघात आला आहे. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात शेवटच्या षटकात दमदार गोलंदाजी केली होती. त्याने फक्त 4 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. भारताने सराव सामना 6 धावांनी जिंकला होता. आता भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरूद्ध मेलबर्नमध्ये खेळणार आहे.

हरभजनची पाकिस्तानविरूद्धची प्लेईंग 11

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

भारताचे सुपर 12 मधील सामने

23 ऑक्टोबर - पाकिस्तान दुपारी 1.30 वाजता मेलबर्न

27 ऑक्टोबर - नेदरलँड, दुपारी 12.30 सिडनी

30 ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका, सायंकाळी 4.30 पर्थ

2 नोव्हेंबर - बांगलादेश, दुपारी 1.30 वाजता अॅडलेड

6 नोव्हेंबर - ग्रुप बी विजेता, दुपारी 1.30 वाजता मेलबर्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT