hardik pandya and dinesh karthik 
क्रीडा

विमानातच रचला होता हार्दिक अन् दिनेश कार्तिकने चक्रव्युह

सामन्यानंतर पांड्या आणि दिनेश कार्तिकची एक विशेष मुलाखत

Kiran Mahanavar

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 82 धावांनी मोठा विजय मिळवला. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या दिनेश कार्तिकने 55 ​​धावांच्या दमदार खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. कार्तिकशिवाय हार्दिक पांड्याने 31 चेंडूत 46 धावा करत संघाला मजबूत धावसंख्या उभारण्यास मदत केली. (hardik pandya and dinesh karthik)

सामन्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या अर्धशतक झळकवणारा, दिनेश कार्तिक आणि भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या मैदानावर बसून संवाद साधला. जे बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइट BCCI.TV वर पोस्ट केले आहे. पांड्याने कार्तिकला त्याच्या अर्धशतकी खेळी आणि पुनरागमनाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले.

बीसीसीआयने त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दिनेश कार्तिकने सांगितले की, मी आणि हार्दिकने फ्लाइटमध्ये राजकोट टी-20 सामन्यासाठी चक्रव्यूह रचला होता. मधल्या फळीतील फलंदाजाला काहीवेळा परिस्थितीचा सामना वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. अशा परिस्थितीत धावा कशा करायच्या, कोणत्या गोलंदाजाला टारगेट करायचे, कुठे धावा काढायच्या हे माहित असणे खूप महत्वाचे असते. मला सुरुवातीला हार्दिककडून खूप मदत मिळाली आणि मला तुझ्यासोबत फलंदाजी करायला आवडते. त्यामुळे आमच्यावर दबाव नव्हता.

प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 169 धावाचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला 16.5 षटकांत केवळ 87 धावांत रोखून सामना 82 धावांनी जिंकला. पाच सामन्यांची मालिका सध्या 2-2 अशी बरोबरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारात डोनाल्ड ट्रम्प यांचाच खोडा, लीक ऑडियो क्लिपमध्ये धक्कादायक खुलासा

IND vs NZ : भारतीय संघाने इतिहास रचला! पाकिस्तानच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी, इंग्लंडमध्ये 'तो' विक्रम नावावर करण्याची संधी

Kolhapur Agriculture : दोन लाख शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’विना, जिल्‍ह्यात ६६.६ टक्के नोंदणी पूर्ण, अजूनही शेतकरी योजनांपासून वंचित

Latest Marathi news Update : दिल्तीतील कर्त्यव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरुवात

Republic Day : पहिले संविधान कुठे छापले गेले? १३ किलो वजनाचा ग्रंथ आणि संविधान निर्मितीची थरारक कहाणी

SCROLL FOR NEXT