hardik pandya and rohit sharma esakal
क्रीडा

Team India: टीम इंडियाला पुन्हा मिळणार आणखी एक नवा कर्णधार, 'या' मालिकेतून रोहित अन् पांड्याची सुट्टी?

Kiran Mahanavar

Team India : टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात टी-20 मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारताच्या बहुतांश युवा खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. मागच्या वेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा संघ आयर्लंडच्या भूमीवर खेळायला गेला होता. यावेळीही तेच अपेक्षित होते. पण आता एक नवीन अपडेट समोर आले आहे की या मालिकेत हार्दिक विश्रांतीवर असेल आणि अशा परिस्थितीत टीम इंडियाला आणखी एक नवीन कर्णधार मिळू शकतो.

हार्दिक आणि गिल यांना मिळणार विश्रांती

भारताचा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या आणि स्टार फलंदाज शुभमन गिल यांना आगामी आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर 18 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते.

बीसीसीआयच्या सूत्राने ही माहिती दिली की, पांड्या हा भारताच्या एकदिवसीय संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू असल्याने तो संघाला संतुलन प्रदान करतो. संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समिती त्याच्यासोबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. अशा परिस्थितीत टीम इंडिया नव्या कर्णधारासह आयर्लंड मालिकेत उतरू शकते. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी या मालिकेत ऋतुराज गायकवाडला संधी दिली जाऊ शकते.

बोर्डातील एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, सध्या काहीही निश्चित झालेले नाही आणि एकदिवसीय आणि टी-20 नंतर हार्दिकला कसे वाटते यावर देखील ते अवलंबून असेल. यामध्ये त्यांना भरपूर प्रवास करावा लागेल आणि फ्लोरिडा ते डब्लिन प्रवास करण्यासाठी फक्त तीन दिवसांचा वेळ असेल. विश्वचषक पाहता वर्कलोड मॅनेजमेंट आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

टीम इंडियाचे व्यस्त वेळापत्रक

भारतीय संघ 27 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्समध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. भारताला आयर्लंडमध्ये पाच दिवसांत तीन टी-20 सामने (18, 20 आणि 23 ऑगस्ट) खेळायचे आहेत. विश्वचषकापूर्वी भारताला आशिया कपही खेळायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT