Hardik Pandya  
क्रीडा

Hardik Pandya : "मी टीम सोबतच! प्रत्येक बॉलला..." वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर पांड्याची भावनिक प्रतिक्रिया!

Kiran Mahanavar

Hardik Pandya World Cup 2023 Team India : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर पडला आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी हा मोठा धक्का आहे.

टीम इंडियाच्या शेवटच्या लीग मॅच किंवा सेमीफायनल किंवा फायनलपूर्वी हार्दिक तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती, पण आता हे स्पष्ट झाले आहे की 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियासाठी कोणताही सामना खेळणार नाही. त्याच्या जागी प्रस‍िद्ध कृष्णाचा संघात समावेश केला आहे.

वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

2023 च्या वर्ल्डकपमधून बाहेर पडल्याबद्दल दु:ख व्यक्त करताना हार्दिक पांड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून लिहिले की, वर्ल्ड कपमधील उर्वरित सामने मी खेळू शकणार नाही हे पचवणे माझ्यासाठी कठीण आहे. मी संघासोबत असणार आहे आणि प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूवर संघासाठी चिअर करणार आहे. सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद, हे अविश्वसनीय आहे. हा संघ खास आहे आणि मला खात्री आहे की सर्वांना अभिमान वाटले.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारताने वर्ल्ड कप 2023 मध्ये तीन सामने खेळले आहेत आणि आतापर्यंत संघाला त्याची उणीव भासली नाही. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे. शमीने 3 सामन्यात 14 विकेट घेत खळबळ माजवली आहे. तर सूर्याने फलंदाजीत चांगली कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT