Rohit Sharma on Hardik Pandya 
क्रीडा

Rohit Sharma on Hardik Pandya: वर्ल्ड कपमध्ये उर्वरित सामने नाही खेळणार उपकर्णधार हार्दिक पांड्या? रोहितने दिली मोठी अपडेट

Kiran Mahanavar

Hardik Pandya Health Update Rohit Sharma : वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा विजयी चौकार. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशचा गुरुवारी 7 गडी राखून पराभव केला. यासह पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. नेट रनरेटमुळे किवी संघ पुढे आहे.

या सामन्यात प्रथम खेळताना बांगलादेशने 256 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 41.3 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. विराट कोहली 103 धावा करून नाबाद राहिला. मात्र, या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाली.

सामन्यात केवळ 3 चेंडू टाकल्यानंतर तो मैदानाबाहेर पडला. त्यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आले. या विजयानंतर रोहित शर्माने पांड्याच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट दिले आहेत.

रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर म्हणाला की, हार्दिक पांड्याचा पाय दुखत आहे, पण मोठे नुकसान झाले नाही. आम्ही दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. उद्या सकाळी तो कसा परफॉर्म करतो ते आपण पाहू आणि त्यानंतर पुढे कसे जायचे याचे नियोजन करू. आणि संघाला जे आवश्यक असेल, आम्ही तसा निर्णय घेऊ.

टीम इंडियाचा पुढचा सामना रविवार 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येक संघाला राऊंड रॉबिन पद्धतीने ९ सामने खेळावे लागतात. अशा स्थितीत किवी संघाविरुद्ध पांड्याबाबत संघ व्यवस्थापन क्वचितच धोका पत्करेल. तो संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे.

धर्मशाला येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळला नाही, तर त्याच्या जागी ऑफस्पिनर आर अश्विनला संधी मिळू शकते. अश्विन पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिसला होता आणि त्याने एक विकेटही घेतली होती. यानंतर शार्दुल ठाकूरला पुढील 2 सामन्यांमध्ये त्याच्या जागी संधी मिळाली. पांड्याच्या दुखापतीनंतर शार्दुल ठाकूरचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT