Hardik Pandya esakal
क्रीडा

जडेजा आऊट होताच हार्दिकने डोक्याला का मारला हात? स्वतःच केला खुलासा

20व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नवाजने जडेजाला क्लीन बोल्ड केले.

धनश्री ओतारी

भारताने आशिया कप 2022 ची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या पाच षटकांमध्ये प्रचंड थरार पाहायला मिळाला. शेवटच्या पाच षटकात भारताला विजयासाठी 51 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा क्रीजवर होते.(Hardik Pandya's heart-wrenching reaction after Jadeja gets clean bowled in tense final over of IND vs PAK)

भारताला शेवटच्या षटकात सात धावांची गरज होती. मोहम्मद नवाज गोलंदाजीसाठी उतरला होता. 20व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नवाजने जडेजाला क्लीन बोल्ड केले. जडेजा 29 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 35 धावा काढून बाद झाला. जडेजा आऊट होताच रनसाठी धावणाऱ्या हार्दिकने डोक्याला हात मारला. त्याची ही रिअॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. दरम्यान, हार्दिकने त्याच्या या रिअॅक्शनबद्दल भाष्य केलं आहे.

सामन्यानंतर हार्दिकने माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्याने सामन्यातील अनेक गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

...म्हणून मी डोक्याला हात मारला

सामन्यादरम्यान, जडेजाला क्रिजवर असताना 'शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेणे मला आवडत नाही.' असे सांगितले. पण त्याच्या उलट घडले. जडेजाने जेव्हा षटकार मारण्याच्या प्रयत्न केला त्यावेळी तो आऊट झाला. त्यामुळे माझी रिअॅक्शन तशी आली. असे पांड्याने यावेळी सांगितले.

रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान, या दोन्ही सामन्यांमध्ये खेळवल्या गेलेल्या ब्लॉकबस्टर सामन्यात विरोधी संघाला भारतानं 5 विकेट्सनं पराभूत केलं. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या तुफानी फटकेबाजीपुढे पाकिस्तानच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT