hardik pandya  
क्रीडा

Team India : आगरकरने हिसकावले पांड्याचे कर्णधारपद, आता 'हा' खेळाडू करणार टी-20 मध्ये नेतृत्व?

सकाळ ऑनलाईन टीम

Team India : क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये डॅशिंग अष्टपैलू हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. भारतीय निवड समितीने त्याला टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून संघात समाविष्ट केले आहे. पण पुढील महिन्यात आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत त्याच्याकडून कर्णधारपद हिरावून घेतले जाऊ शकते. या मालिकेत हार्दिक पांड्याची निवड होणार नसल्याचे बोलले जात आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2022 च्या टी-20 विश्वचषकात पराभूत झाल्यापासून हार्दिक पांड्याकडे क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. भारतीय निवडकर्त्यांनी अनेकदा त्याच्या हातात टी-20 कर्णधारपद दिले आहे. पण नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्या पुढील महिन्यात आयर्लंडसोबत होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत संघात सामील होणार नाही. या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

हार्दिक पांड्या ऑगस्टच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करेल. ही मालिका 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान कॅरेबियन भूमीवर खेळवली जाईल. तर भारताचा आयर्लंड दौरा 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय निवड समितीने हार्दिक पांड्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी बोर्डाला आपल्या वरिष्ठ खेळाडूंना तंदुरुस्त ठेवायचे आहे. मात्र हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारची कर्णधारपदी नियुक्ती होऊ शकते. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारताला 20 आणि 23 ऑगस्टला आयर्लंडसोबत मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना खेळायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT