Hardik Pandya India vs Pakistan World Cup 2023  sakal
क्रीडा

Hardik Pandya : 'मी स्वत:ला शिव्या...', जाणून घ्या पाकिस्तानविरुद्ध मंत्र बोलताना हार्दिक पांड्या काय म्हणाला

Kiran Mahanavar

Hardik Pandya India vs Pakistan World Cup 2023 : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारतीय संघाने एक दम भारी सुरूवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पहिले तीन सामने जिंकले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी (१४ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध तिसरा सामना झाला. भारतीय संघाने अवघ्या 30.3 षटकांत 7 विकेट्स राखून सामना जिंकला.

या सामन्यात उपकर्णधार हार्दिक पांड्याने 34 धावांत 2 विकेट घेतल्या. पण या सामन्यादरम्यान त्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो हातात चेंडू धरून काही मंत्र बोलत आहे. यानंतर तो गोलंदाजी करतो आणि पुढच्याच चेंडूवर विकेट घेतो.

पांड्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांना उत्सुकता होती की पांड्याने काय केले? आता पांड्याने याचा खुलासा केला आहे. सामन्यानंतर माजी दिग्गज गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांच्याशी संवाद साधताना पांड्या गंमतीने म्हणाला की, मी स्वत:ला शिव्या देत होतो.

खरंतर, पाकिस्तानच्या डावातील 13 वे षटक हार्दिक पांड्याने टाकले. तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी हार्दिक त्याच्या दोन्ही हातात चेंडू घेऊन काहीतरी बोलताना दिसला. काही बोलल्यावर पांड्याने तिसरा चेंडू टाकला आणि इमाम उल हक स्ट्राईकवर होता, तो त्या चेंडूवर विकेटकीपर केएल राहुलच्या हाती झेलबाद झाला. इमामने 38 चेंडूत 36 धावा केल्या.

सामन्यानंतर हा खुलासा करताना हार्दिक पांड्या त्या घटनेवर म्हणाला, 'मी स्वतःशी अगदी साध्या पद्धतीने बोललो होतो. मुळात मी स्वतःशीच शिव्या देत होतो. कारण मी एका ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो. आणि वेगळे काही करायला जाऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT