क्रीडा

Hardik Pandya : कर्णधार हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्सला राम राम, IPL-2024 मध्ये 'या' संघाचा धरला हात?

Kiran Mahanavar

IPL 2024 Hardik Pandya : आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी क्रिकेट चाहत्यांना संघात मोठा बदल दिसू शकतो. भारताचा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग लिलावापूर्वी गुजरात टायटन्सला सोडू शकतो. हार्दिक पांड्या कोणत्या संघात सामील होणार याबाबत आता अहवाल समोर आला आहे.

30 वर्षीय हार्दिक गुजरात टायटन्स सोडून पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये सामील होऊ शकतो. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने या घडामोडीवर भाष्य करण्यास नकार दिला. पण हार्दिक पुन्हा संघात सामील होऊ शकतो अशी अटकळ आहे.

अशा परिस्थितीत 26 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, जेव्हा आयपीएलची 'ट्रेडिंग विंडो' बंद होईल. हार्दिक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 7 हंगाम खेळला आहे. 2022 च्या हंगामापूर्वी तो 'रिलीझ' झाला होता.

गुजरात टायटन्समध्ये सामील झाल्यानंतर हार्दिक पांड्याने या नवीन आयपीएल संघाला सलग दोनदा टी-20 लीगच्या फायनलमध्ये नेले. यामध्ये गुजरात संघानेही पदार्पणाच्या हंगामात विजेतेपद पटकावले.

गुजरात टायटन्समधील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या आयपीएलच्या सूत्राने सांगितले, हार्दिकला मुंबई इंडियन्सशी जोडण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे संघात बदल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे, मात्र सध्या अधिक काही सांगता येणार नाही. हार्दिकने अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT