Hardik Pandya sakal
क्रीडा

Hardik Pandya पुढच्या वर्षी निवृत्ती घेणार!... धक्कादायक दावा

हार्दिक पांड्या 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेट सोडणार आहे.

Kiran Mahanavar

Hardik Pandya : टीम इंडियाचा डॅशिंग अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आता सध्या उत्कृष्ट मधून जात आहे. पांड्याने आयपीएलमध्ये नवीन संघाची जबाबदारी घेतली. प्रथमच हंगाम खेळणारी गुजरात टायटन्स त्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले. भारतीय क्रिकेट संघात त्यानंतर त्याचे पुनरागमनही झाले.

संघात आगमन होताच त्याला कर्णधारपदाची संधीही मिळाली. सगळं चांगलं चालू असताना हार्दिक पांड्या पुढच्या वर्षभरात निवृत्त होणार आहे असे कोणी म्हटले तर, सर्वांना आश्चर्य तर वाटणारच. असंच धक्कादायक वक्तव्य भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धक्कादायक वक्तव्य सध्याची परिस्थिती पाहता केले आहेत. कारण बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले होते. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो.

खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे त्याच्यासाठी जवळपास अशक्य झाले होते. बेन स्टोक्स वरून रवी शास्त्री यांनी भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबद्दल भाकीत केले आहे. ते म्हणतात की, पांड्या 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेट सोडणार आहे.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारताचे माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. स्काय स्पोर्ट्सवर बोलताना शास्त्री यांनी एकदिवसीय फॉरमॅटच्या भविष्यावरील चर्चेवर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की 2023 च्या विश्वचषकानंतर हार्दिक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT