Hardik Pandya News In Marathi sakal
क्रीडा

Hardik Pandya : हार्दिक पांड्याने दिले पुनरागमनाचे संकेत; शेअर केला नवीन व्हिडिओ; कोणाचा पत्ता होणार कट?

Kiran Mahanavar

Hardik Pandya News : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या संघाबाहेर आहे. 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती, त्यानंतर हार्दिक बराच काळ संघाबाहेर होता. हार्दिक पांड्याच्या संघात पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दुसरीकडे हार्दिक पांड्याही सातत्याने पुनरागमनाचे संकेत देत आहे. सध्या हार्दिक पांड्या जिममध्ये खूप मेहनत करत आहे. ज्याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हार्दिक पांड्या आजकाल स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत करत आहे. आता हार्दिक पांड्याने वर्कआऊट करतानाचा त्याचा नवीन व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हार्दिक पांड्याने जमिनीवर एएम टू पीएम असे लिहिले आहे.

म्हणजेच आता हार्दिक पांड्याने संघात पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स संघाचा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता हार्दिकला स्वत:ला लवकरात लवकर तंदुरुस्त करायचे आहे. ज्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करत आहे.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत शिवम दुबेचा संघात समावेश करण्यात आला आहे. शिवम दुबे हा देखील हार्दिक पांड्यासारखा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. शिवम दुबेने अफगाणिस्तानसोबत खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे.

शिवम दुबेनेही या मालिकेत दोन अर्धशतके झळकावली आहेत. आता हार्दिक पांड्या संघात परतल्यावर कोणत्या खेळाडूला बाहेर ठेवले जाईल हा मोठा प्रश्न आहे. हार्दिकच्या पुनरागमनामुळे उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या शिवम दुबेचे स्थानही धोक्यात येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT