Hardik Pandya And Krunal Pandya Sakal
क्रीडा

डायरेक्ट मॅचला येऊन चालणार नाही; पांड्या बंधूतील एक आला अन्...

बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पांड्या आगामी स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सुशांत जाधव

भारतीय संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) देशांतर्गत स्पर्धेतील विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021/22) स्पर्धेतून माघार घेतली आहे. पुन्हा एकदा जोमाने गोलंदाजी करण्यासाठी तो रिहॅबिलिटेशन (Rehabilitation) प्रक्रियेतून जात आहे. पाठिच्या दुखापतीनंतर तो फारसा गोलंदाजी करताना दिसला नाही. त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्हही उपस्थितीत करण्यात आले. त्याच्या निवडीमुळे बीसीसीआय निवड समिती अडचणीत आली होती. त्यानंतर हार्दिक पांड्याने राष्ट्रीय संघातील निवडीसाठी स्वत: दूर जात असल्याचे सांगत निवड समितीने तुर्तास माझा विचार करु नये, अशी विनंती केली होती. आता त्याने देशांतर्गत क्रिकेटमधूनही माघार घेतली आहे.

बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पांड्या आगामी स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले की, विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भाग घेणार का? अशी विचारणा करण्यासाठी आम्ही (बडोदा क्रिकेट असोसिएशन (BCA) ने) त्याच्याशी (Hardik Pandya) संपर्क केला होता. मागील तीन वर्षांपासून तो मुश्किलीनं बडोदा संघाकडून खेळताना दिसले. सध्याच्या घडीला रिहॅबिलिटेशनमधून जात असल्याचा रिप्लाय पांड्याने दिल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे संबंधित अधिकाऱ्यानं हार्दिक पांड्याचा भाऊ क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) एका आठवड्यापूर्वीच शिबिरात सामील झाल्याचे सांगितले. बडोदा असोसिएशनने त्याला खास वॉर्निंग दिली होती. फक्त मॅच खेळायला येऊन चालणार नाही. स्पर्धेत खेळायचे असेल तर शिबिराला उपस्थितीत रहावे लागेल, अशी थेट भूमिका असोसिएशनने घेतली होती. त्यानंतर क्रुणाल पांड्याला शिबिरात हजर रहावे लागले. सध्याच्या घडीला बरेच स्टार खेळाडू शिबिरात जाण्याऐवजी थेट मॅच खेळण्यासाठी संघात जॉईन होतात. टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर आणि प्रसिद्ध झाल्यावर अनेक खेळाडूंमध्ये ही वृत्ती निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. बडोदा असोसिएशनने असा लाड पुरवण्यास मनाई करत नियम सर्वांना सारखा असतो, हेच दाखवून दिल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT