hardik pandya  Google
क्रीडा

"जरा जाडा हो"; पाकिस्तानी क्रिकेटरचा हार्दिक पांड्याला सल्ला

विराज भागवत

हार्दिकला नक्की का दिला असा सल्ला, वाचा सविस्तर

नवी दिल्ली: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची आतापर्यंतची क्रिकेट कारकिर्द फारच चर्चेत राहिली. IPL मध्ये मुंबईच्या संघातून त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्यानंतर भारतीय संघात त्याने स्थान पटकावले आणि एक अढळ असं स्थान पटकावलं. क्रिकेट कारकिर्दीच्या शिखरावर असताना एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर काही काळासाठी क्रिकेटबंदीची कारवाई झाली, पण त्यानंतर संघात त्याने दमदार पुनरागमन केलं. सरळं सुरळीत सुरू असताना त्याच्या दुखापतीने उचल खाल्ली आणि त्यामुळे त्याला अनेक क्रिकेट मालिकांना मुकावे लागले. आता हार्दिक पांड्या फिट असून टी२० विश्वचषक संघात त्याला संधी मिळेल अशी साऱ्यांनाच अपेक्षा आहे. अशातच पाकिस्तानचा माजी सलामीवीर सलमान बट याने हार्दिकला थोडं वजन वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

"भारतीय संघासाठी हार्दिक पांड्या हा एक अतिशय धडाकेबाद खेळाडू आहे. तो अतिशय प्रतिभावान फलंदाज आहे. दुखापतीच्या आधीच्या काळात तो गोलंदाजी करायचा तेव्हादेखील त्याचा गोलंदाजीचा वेग चांगला होता. पण हार्दिकची मुख्य समस्या म्हणजे हार्दिक अतिशय बारीक शरीरयष्टीचा आहे. हार्दिकने थोडं वजन वाढवलं तर तो सारखा दुखापतग्रस्त होणार नाही. हार्दिकने जाड व्हायला हवं. फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी लागणारी प्रतिभा त्याच्यात आहे. दोन्ही गोष्टी तो उत्तम करतो. पण तो खूपच बारीक असल्याने त्याच्या शरीरावर आलेला अतिरिक्त ताण त्याचे शरीर सहन करू शकत नाही. त्याकडे हार्दिकने वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे", असं स्पष्ट मत सलमान बटने व्यक्त केलं.

Hardik Pandya

सलमानने हार्दिकला आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव आणि इम्रान खान यांची उदाहरणं दिली. "जर हार्दिकची तुलना तुम्ही कपिल देव किंवा इम्रान खान यांच्याशी केलीत तर ते दोघेही त्याच्यापेक्षा जास्त तंदुरूस्त होते. तुम्ही त्यांच्या व्हिडीओ युट्यूबवर पाहू शकता. ते दोघेही हार्दिकपेक्षा दुप्पट होते. हार्दिकला कोणती शारिरीक समस्या असेल तर मला माहिती नाही. पण तसं काही नसेल तर संघाचे फिजिओ त्याच्याशी वजन वाढवण्याबद्दल नक्कीच बोलत असतील", असेही सलमानने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Water Scarcity: पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश! महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

Latest Marathi News Live Update : 3 गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तीन जणांना अटक

SCROLL FOR NEXT