Hardik Pandya Shut Critics Mouth India Won 1st T20I Against England esakal
क्रीडा

Hardik Pandya : कुंफू पांड्याची अष्टपैलू कामगिरी; सर्वांची बोलती केली बंद!

अनिरुद्ध संकपाळ

साऊथहॅम्पटन : भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात धुमाकूळ घातला. त्याने फलंदाजी करताना दमदार 51 धावांची अर्धशतकी खेळी केली तर गोलंदाजीत 33 धावात 4 विकेट घेतल्या. हार्दिकच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. हार्दिक पांड्या टी 20 क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करून 4 विकेट घेणारा चौथा फलंदाज ठरला. (Hardik Pandya Shut Critics Mouth India Won 1st T20I Against England)

भारताचे विजयासाठीचे 199 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार जॉस बटलरला शुन्यावर बाद केले. त्यानंतर आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड मिलानला (21) हार्दिक पांड्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याच षटकात पांड्याने लिम लिव्हिंगस्टोनचा (0) अडसर देखील दूर केला.

हार्दिक पांड्या इथेच थांबला नाही. त्याने 16 चेंडूत संथ गतीने 4 धावा करणाऱ्या जेसन रॉयला देखील बाद करत इंग्लंडला 33 धावांवर चौथा धक्का दिला. जेसन रॉय बाद झाल्यानंतर मोईन अली आणि हॅरी ब्रूक यांनी पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. मात्र 13 वे षटक टाकणाऱ्या चहलने पहिल्या चेंडूवर 28 धावा करणाऱ्या ब्रूकला आणि पाचव्या चेंडूवर 36 धावा करणाऱ्या मोईन अलीला बाद केले.

मोईन अली बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाला अखेरची घरघर लागली. त्यात हार्दिक पांड्याने सॅम करनला 4 धावांवर बाद करत इंग्लंडला सातवा धक्का दिला. यानंतर पदार्पण करणाऱ्या अर्शदीप सिंगने दोन विकेट घेत इंग्लंडचा डाव 148 धावात संपवला. भारताने सामना 50 धावांनी सामना जिंकला.

तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे कसोटीला मुकलेल्या रोहितने संघात पुनरागमन करताच आक्रमक अवतार धारण केला.

रोहितने 14 चेंडूत 24 धावा ठोकत भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डाने ही आक्रमकता कॅरी फॉरवर्ड करत भारताची धावगती चांगली राखत भारताला 9 व्या षटकातच नव्वदीत पोहचवले. मात्र इंग्लंडने ठराविक अंतराने भारताला धक्के देण्यास सुरूवात केली. ख्रिस जॉर्डनने पहिल्यांदा हुड्डाला 33 धावांवर त्यानंतर सूर्यकुमार यादवला 39 धावांवर बाद केले.

मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याने भारताच्या डावाची सूत्रे आपल्या हातात घेत टी 20 क्रिकेटमधील आपले पहिले वहिले अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतकानंतर तो लगेचच 51 धावावर बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकने टायमर मिल्स टाकत असलेल्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार मारत चांगली सुरूवात केली. मात्र तो मात्र तो 7 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. अखेर भारताने 20 षटकात 8 बाद 198 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT