Hardik Pandya Reaction IND vs NZ 1st T20I esakal
क्रीडा

Hardik Pandya : कोणाच्याही ध्यानी मनी नव्हतं की... कर्णधार पांड्याला पराभवानंतर बसला धक्का

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Reaction IND vs NZ 1st T20I : भारताकडून वनडे मालिकेत 3 - 0 असा व्हाईट वॉश सहन करावा लागलेल्या न्यूझीलंडने पहिल्याच टी 20 सामन्यात भारताला पराभवाची धूळ चारली. न्यूझीलंडने भारताचा 21 धावांनी पराभव करत तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, सामन्याच्या 19 व्या षटकापर्यंत भारताच्या नियंत्रणात असलेला सामन्यात 20 व्या षटकानंतर न्यूझीलंडचे पारडे जड झाले. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने पराभवानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

हार्दिक पांड्या म्हणाला की, 'कोणाच्याही ध्यानी मनी नव्हते की रांचीची खेळपट्टी अशी आश्चर्याचा धक्का देईल. दोन्ही संघांना खेळपट्टीने धक्का दिला. मात्र न्यूझीलंड आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले. त्यामुळेच सामन्याचा निकाल असा लागला आहे.'

खेळपट्टीबाबत बोलताना पांड्या म्हणाला की, 'खरं तर खेळपट्टीवर जुन्या चेंडूपेक्षा नवीन चेंडू जास्त स्पिन करत होता. ज्या प्रकारे चेंडू स्पिन झाला, उसळी घेतली ते आश्चर्यकारक होते. असे असले तरी सूर्या आणि मी फलंदाजी करत असताना आम्ही सामना खेचून आणला होता.'

पांड्या पुढे म्हणाला, 'माझ्या मते ही विकेट 177 धावांची नव्हती आम्ही गोलंदाजीत 20 ते 25 धावा जास्त दिल्या. भारताचा हा युवा संघ आहे. आम्ही या पराभवातून शिकत आहोत. वॉशिंग्टन सुंदरबद्दल बोलायचे झाले तर ज्या प्रकारे तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करतोय ते कमाल आहे.'

न्यूझीलंडने पहिल्यादा फलंदाजी करत 176 धावा केल्या होत्या. डॅरेल मिचेलने 59 तर कॉन्वेने 52 धावांची खेळी केली. त्याच्या प्रत्युत्तरात भारताला फक्त 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 28 चेंडूत 50 धावा चोपल्या. तर सूर्यकुमार यादवनेही 47 धावा केल्या. मात्र सँटनर आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT