Hardik Pandya To Join Mumbai Indians Again but needs to release or trade big players ipl 2024  
क्रीडा

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून खेळणार पांड्या, पण अंबानींच्या पर्समध्ये पैशांची कमी! कसं होणार शक्य?

Kiran Mahanavar

Hardik Pandya : पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलची तयारी सुरू झाली आहे. ट्रेडिंग विंडो संपायला फक्त काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत सर्व आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या गरजेनुसार खेळाडूंची निवड करत आहेत.

दरम्यान, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, कर्णधार हार्दिक पांड्या, ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले, तो त्याच्या जुन्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्समध्ये परत येऊ शकतो.

मात्र, मुंबईकडे सध्या पर्समध्ये पैशांची कमी आहे. 26 तारखेला विंडो बंद होईल. त्यापूर्वी ही रक्कम मुंबईला भरावी लागणार आहे.

हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सने 15 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या खेळाडूसाठी सध्या मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये जागा नाही. गेल्या आयपीएल लिलावानंतर त्याच्याकडे फक्त 5 लाख रुपये शिल्लक होते. अशा स्थितीत 15 कोटी रुपये जमवायचे असतील तर काही एक-दोन बड्या खेळाडूंना सोडावे लागेल. या यादीत जोफ्रा आर्चर आणि कॅमेरून ग्रीन ही नावे दिसत आहेत.

हार्दिक पांड्याला जर संघात घ्यायचा असेल तर मुंबई इंडियन्सकडे जोफ्रा आर्चर आणि कॅमेरून ग्रीन यांना सोडावे लागले. मुंबईने 17.50 कोटी रुपयांच्या मोठ्या किमतीत ग्रीनला विकत घेतले होते. पण गेल्या आयपीएलमध्ये ग्रीनची कामगिरी किमतींच्या अनुरूप नव्हती. आणि तो सध्या चांगल्या फॉर्ममध्येही नाही.

यासह मुंबई इंडियन्स जोफ्रा आर्चर (8 कोटी) आणि इतर काही खेळाडूंना सोडून हार्दिकसाठी जागा बनवू शकते. आर्चर शस्त्रक्रियेमुळे गेल्या मोसमातही मुंबईकडून खेळू शकला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT