Hardik Pandya Best Answer To Critics esakal
क्रीडा

अखेर पांड्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ; आयर्लंड दौऱ्यात करणार नेतृत्व

हार्दिक पांड्यानं आयपीएलमध्ये गुजरातच्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. तेव्हापासूनच त्याच्याकडे कर्णधारपद येण्याची शक्यता वर्तवली जात होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलमध्ये गुजरातच्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याच्या गळ्यात अपेक्षेप्रमाणं आयसीसीच्या T-20 मालिकेसाठी कर्णधारपदाची माळ पडली आहे. आयर्लंड दौऱ्यामधील दोन T-20 सामन्यांसाठी भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. बीसीसीआयनं बुधवारी याची घोषणा केली. (Hardik Pandya to lead Indian team in T20 series against Ireland says BCCI)

महिन्याभरानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी होणाऱ्या T-20 संघ बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅम्सन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक या खेळाडूंचा सामावेश असणार आहे.

दरम्यान, भारताचा तीनही फॉरमॅटमधील महत्वाचा खेळाडू असलेल्या केएल राहुलला दुखापत झाल्याने तो इंग्लंड विरूद्धचा एकमेव कसोटी सामना मुकण्याची शक्यता आहे. तो अजून दुखापतीतून सावरलेला नसल्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेपाठोपाठ इंग्लंड दौऱ्यातील कसोटीला आणि आयर्लंड दौऱ्यालाही मुकणार आहे. सध्या ऋषभ पंत भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करत आहे, तो इंग्लंडमध्ये कसोटी खेळणार आहे. पण पंतला आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली असल्यानं या दौऱ्यात होणाऱ्या T-20 च्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या निवड समितीनं घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT