Harjinder Kaur won the bronze in Weightlifting women's 71kg category in Commonwealth Games 2022 Birmingham esakal
क्रीडा

Commonwealth Games : वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदरने भारताला मिळवून दिले कांस्य

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 : भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने 71 किलो वजनीगटात भारताला कांस्य पदक पटकावून दिले. तिने एकूण 212 किलो वजन उचलले. यात स्नॅच प्रकारात 93 किलो तर क्लीन अँड जर्क प्रकारात 119 किलो वजन उचलले. भारताचे हे दिवसातले तिसरे पदक ठरले. यामुळे भारताची पदक संख्या 9 वर पोहचली. वेटलिफ्टिंगमधून हे भारतासाठीचे सातवे पदक ठरले. विशेष म्हणजे हरजिंदर कौर चौथ्या स्थानावर राहील असे वाटत होते. मात्र शेवटच्या क्षणी नायजेरियन वेटलिफ्टरला क्लीन अँड जर्कचा शेवटचा प्रयत्न फसला आणि कौरच्या गळ्यात कांस्य पदक पडले.

भारतीय खेळाडूंनी बर्मिंगहॅममध्ये चौथ्या दिवशी देखील आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. भारताने कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत सहा पदके जिंकली असून ही सर्व पदके वेटलिफ्टिंग मधून आली आहे. आज चौथ्या दिवशी भारतीय महिला लॉन बॉल संघाने इतिहास रचत राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. त्यांनी रौप्य पदक पक्के केले.

त्याचबरोबर महिला ज्यूडो स्पर्धेत 48 किलो महिला वजनी गटात सुशिला देवीने रौप्य पदक पटकावले. ज्यूदोमध्येच पुरूष 60 किलो वजनी गटात विजय कुमार यादवने भारतला कांस्य पदक पटकावून दिले. यानंतर अखेरच्या क्षणी वेटलिफ्टर हरजिंदर कौरने 71 किलो वजनी गटात भारताला कांस्य पदक मिळवून देत पदक संख्या 9 वर नेली. वेटलिफ्टिंगमधून भारताला 7 वे पदक मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Navy Deployment: फ्रान्सची युद्धनौका भूमध्य समुद्रात, मॅक्रॉन, मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आदेश

अय्यो, ही तर डिट्टो कॉपी! रश्मिका मंदाना सेम टू सेम दिसते आईसारखी! सोशल मीडियावर Viral Video

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर नगरसेवकांचा डल्ला? अंदाजपत्रकात ३०० कोटींच्या वाढीची शक्यता

"माझ्या मृत्यूला कुटूंब जबाबदार.." प्रसिद्ध युट्युबरचा धक्कादायक Video; या कारणामुळे करतोय डिप्रेशनचा सामना

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

SCROLL FOR NEXT