Harmanpreet Kaur Tease Bangladesh Captain Sultana sakal
क्रीडा

IND Vs BAN : 'तुमच्याबरोबर पंचांनाही बोलवा...' हरमनचा 'तो' टोमणा, बांगलादेश कर्णधाराचा संयम तुटला अन्...

सकाळ ऑनलाईन टीम

Harmanpreet Kaur Tease Bangladesh Captain Sultana : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचे नाव सध्या चर्चेत आहे. बांगलादेशसोबत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यानंतर हरमनला राग अनावर झाला. तिने बॅट स्टंपवर मारले आणि पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्यानंतर सामना संपल्यानंतर हरमनने अंपायरिंगवरही बरीच टीका केली. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हरमन बांगलादेशी कर्णधार सोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.

सामन्याचा निकाल बरोबरीत सुटल्याने इतर काही निर्णयांवरही हरमनप्रीत कौर नाराज होती. यानंतर जेव्हा ती मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनसाठी आली तेव्हा तिने पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की, भविष्यात आम्ही इथे आलो तर आमच्यासोबत असे होईल, असा विचार करून आम्ही येऊ. हरमनप्रीतचे गैरवर्तन इथेच थांबले नाही.

जेव्हा भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना यांना ट्रॉफी देण्यासाठी बोलावण्यात आले, तेव्हा हरमनने खराब अंपायरिंगबद्दल शोक व्यक्त केला आणि अंपायरला बोलावण्यास सांगितले. ते म्हणाले, 'पंचांनाही घेऊन या. इथे फक्त तुम्हीच का आहात. तुम्ही सामना टाय केला नाही. पंचांनी तुमच्यासाठी केले आहे. त्यांनाही बोलावून घ्या. त्यांनी आमच्यासोबत पोज दिल्यास आम्हाला आवडेल.

ट्रॉफी शेअर करताना बांगलादेशी कर्णधाराने स्वत:ला सांभाळले तोपर्यंत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने त्याला टोमणे मारले. यानंतर बांगलादेशी कर्णधाराचा संयम सुटला आणि संपूर्ण संघासह सुलतानाने तिथून निघून गेली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यानंतर हरमनच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT