Harmanpreet Kaur esakal
क्रीडा

IND vs AUS T20 World Cup : हरमनप्रीतची बॅट अडकली अन् भारताचा विजयही; फक्त 5 धावा पडल्या कमी

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS Harmanpreet Kaur : भारताने ऑस्ट्रेलियाच्या 173 धावांचे आव्हान पार करताना झुंजार वृत्ती दाखवत 167 धावांपर्यंत मजल मारली. भारताचा फक्त 5 धावांनी पराभव झाला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने 52 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली. मात्र 15 व्या षटकात दुसरी धाव घेताना हरमनप्रीतची बॅट अडकली अन् ती धावबाद झाली. हरमननेदेखील ही धाव घेताना थोडी निष्काळजीपणा दाखवला. भारताने सामना तिथेच हरला. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने 24 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी करत हरमनला चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाने 173 धावांचे मोठे आव्हान ठवेल्यानंतर भारताने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मृती मानधना 2 शफाली वर्मा 9 तर यस्तिका भाटिया 4 धावा करून बाद झाल्या.

मात्र त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्जने फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्येच 59 धावांपर्यंत मजल मारली. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत भारताला 10 व्या षटकातच नव्वदी पार करून दिली.

हरमनसोबतच जेमिमाहही आज चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करत होती. तिने 24 चेंडूत 43 धावा चोपत हरमनसोबत चौथ्या विकेट्ससाठी 69 धावांची भागीदारी रचली. मात्र ब्राऊनने ही जोडी फोडली.

जेमिमाह रॉड्रिग्ज बाद झाल्यानंतर भारताची धावगती मंदावली. हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी भारताला 13 षटकात 4 बाद 111 धावांपर्यंत मजल मारली. मात्र यानंतर रिचाने आपला गिअर बदलला. या दोघांनी सामना 35 चेंडूत 45 धावा असा आणला. हरमन आपले अर्धशतक 32 चेंडूत पूर्ण केले.

मात्र भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर अर्धशतकानंतर विचित्र पद्धतीने धावबाद झाली. तिची बॅट अडकल्यामुळे ती क्रीजमध्ये वेळेत पोहचू शकली नाही. हरमन 34 चेंडूत 52 धावा करून बाद झाल्यानंतर सामना 30 चेंडूत 39 धावा असा आला. हरमन बाद झाल्यानंतर रिचा 17 चेंडूत 14 धावा करून बाद झाली. यामुळे चेंडू आणि धावांमधील अंतर देखील वाढले.

आता सामना 18 चेंडूत 31 धावा असा आला होता. दिप्ती शर्मा क्रीजवर होती. तिच्या साथीला स्नेह राणा देखील होती. या दोघींनी सामना 12 चेंडूत 20 धावा असा आणला. 19 व्या षटकात जोनासेनने स्नेह राणाला बाद करत फक्त 4 धावा दिल्या. त्यामुळे आता सामना 6 चेंडूत 16 धावा असा आला.

दिप्ती शर्माने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर प्रत्येकी 2 अशा 4 धावा केल्या. सामना 4 चेंडूत 12 धावा असा आला. मात्र गार्डनेरने तिसऱ्या चेंडूवर 1 धाव दिली. सामना 3 चेंडूत 11 धावा होता मात्र राधा यादव शुन्यावर बाद झाली. सामना 2 चेंडूत 11 धावा असा ऑस्ट्रेलियाच्या हातात होता. मात्र ऑस्ट्रेलियाने सामना 5 धावांनी जिंकला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने महिला टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 173 धावांचे तगडे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने 54 धावांची अर्धशतकी तर कर्णधार मेघ लेनिंगने नाबाद 49 धावांची दमदार खेळी केली. याचबरोबर अॅश्लेघ गार्डनेर 18 चेंडूत 31 धावा चोपल्या. भारताकडून शिखा पांडेने 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

Vice President election 2025: उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आता ‘या’ दोन पक्षांनी टाकला मतदानावर बहिष्कार

Uran Fire: मोठी बातमी! सरकारच्या ताब्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पात भीषण आग, उरणमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Updates : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाज प्रचंड नाराज

Yermala Crime : सोलापूर-धुळे महामार्गावर चालत्या ट्रकमधून दिवसाढवळ्या चोरी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल; मागील चालकांनी केला प्रतिकार, तरीही चोरटे फरार

SCROLL FOR NEXT