harmanpreet kaur sakal
क्रीडा

Harmanpreet Kaur : हरमनने रचला इतिहास, ICC पुरस्कार जिंकणारी ठरली पहिली भारतीय

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पटकावले प्लेयर ऑफ द मंथ

Kiran Mahanavar

Harmanpreet Kaur : आयसीसीने सप्टेंबर महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारात दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारावरही भारताचे वर्चस्व आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला महिलांमध्ये हा सन्मान देण्यात आला आहे. आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड जिंकणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

महिलांमध्ये हरमनप्रीतचा सामना भारताच्या स्मृती मानधना आणि बांगलादेशच्या निगार सुलतानाशी होता. निवडलेल्या तीनही खेळाडूंनी अलीकडच्या काळात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या हरमनप्रीत आणि मंधाना यांनी गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका गमावली असली तरी वनडे मालिकेत इंग्लंडचा सफाया केला.

हरमनप्रीतने इंग्लंडविरुद्धच्या निराशाजनक टी-20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केले. तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 221 च्या सरासरीने 221 धावा केल्या आणि ती सर्वाधिक धावा करणारी ठरली. हरमनने पहिल्या सामन्यात नाबाद 74 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 143 धावा केल्या. यामुळे भारताने 1999 नंतर इंग्लंडमध्ये पहिली वनडे मालिका जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT