Harmanpreet Kaur Pooja Vastrakar Shine Indian Women's Cricket Team Score 255 Runs Against Sri Lanka esakal
क्रीडा

SLW vs INDW : हरमनप्रीतची कॅप्टन्स इनिंग; वर्मा - वस्त्राकर देखील चमकल्या

अनिरुद्ध संकपाळ

पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (Sri Lanka Women vs India Women) यांच्यातील महिला क्रिकेट संघांमध्ये मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना (3rd ODI) होत आहे. या सामन्यात श्रीलंकेने भारताला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. भारताने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) 75 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेसमोर 256 धावांचे आव्हान उभारले. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्मा (49) आणि पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) (नाबाद 56) यांनी देखील आपले योगदान दिले. लंकेकडून रणवीरा, रश्मी डिसेल्वा आणि आटापटू यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला स्मृती मानधनाच्या रूपात पहिला धक्का बसला. ती अवघ्या 6 धावांची भर घालून माघारी परतली. दरम्यान, दुसरी सलामीवीर शेफाली वर्मा आक्रमक फलंदाजी करत धावा करण्याचा प्रयत्न करत होती. तिला साथ यस्तिका भाटिया देखील चांगली साथ देत होती. मात्र रणवीराने यस्तिका भाटियाला 30 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. शेफाली वर्मा देखील 49 धावा करून बाद झाली. तिचे अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकले. यानंतर आलेल्या मधल्या फळीतील फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.

भारतीय महिला क्रिकेट संघाची अवस्था 5 बाद 118 धावा अशी झाली असताना हरमनप्रीत कौरने संघाचा डाव सावरत 75 धावांची खेळी केली. तिने पूजा वस्त्राकरसोबत सातव्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी रचली. मात्र हरमनप्रीत बाद झाली आणि ही जोडी फुटली. त्यानंतर पूजाने नाबाद 56 धावांची खेळी करत भारतला 50 षटकात 9 बाद 255 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nakul Bhoir Case: नकुल भोईर हत्या प्रकरणाला वेगळं वळण, एकटीने पतीला कसं संपवलं? भावाने वहिनीविरोधात दिली तक्रार

Latest Marathi News Live Update : पर्यायी मार्गाचा वापर करा, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आवाहन

Pune News: पुण्याला सोडतो म्हणत पहाटे ३ वाजता लिफ्ट दिली; वाटेतच झुडपात नेत अत्याचार, आरोपीला अटक

Action Under MCOCA : इचलकरंजीतील ‘एसएन गॅंग’च्या सहा जणांवर मोकाखाली कारवाई

Kolhapur Rape News : कोल्हापुरात क्रुरतेचा कळस! विळ्याचा धाक दाखवत बापाकडून पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT