Smriti Mandhana Harmanpreet Kaur  Sakal
क्रीडा

BCCIचा महिला संघाशी भेदभाव! लंकेविरूद्धच्या सामन्याचे प्रक्षेपण होणार नाही?

टी-२० मालिकेचे थेट प्रक्षेपण न झाल्याने हरमनप्रीतला बसला धक्का

Kiran Mahanavar

भारतीय महिला क्रिकेट संघ गुरुवारपासून श्रीलंका दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर वनडे मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयकडून या मालिकेच्या थेट प्रसारणाबाबतची परिस्थिती स्पष्ट नाही. श्रीलंका पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण क्रिकेटच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर करणार आहे. मात्र ही मालिका भारतात प्रसारित करण्याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका सूरू होण्याआधी तिने आपले मत मांडले आहे.

पत्रकार परिषदेत हरमनप्रीत कौर म्हणाली, मी मालिकेच्या टेलिकास्टबद्दल काही गोष्टी ऐकल्या आहे. मात्र बोर्डाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मला वाटते शेवटच्या क्षणापर्यंत यावर काहीतरी केले जाईल. या मालिकेच्या प्रसारणाबाबत बीसीसीआय शेवटच्या क्षणी नक्कीच काहीतरी पाऊल उचलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय संघात अनेक अव्वल फलंदाज आहेत आणि भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने म्हटले आहे की, गुरुवारपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या T20 मालिकेत सर्वांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. डावखुरा फलंदाज स्मृती मानधना, आक्रमक फलंदाज शेफाली वर्मा, साभिनेनी मेघना आणि यास्तिका भाटिया हे भारताच्या १५ जणांच्या संघात अव्वल फळीतील फलंदाज आहेत. स्मृतीच्या अनुपस्थितीत शेफाली आणि यस्तिकाने फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध डावाची सुरुवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! IT शेअर्सचा जोरदार कमबॅक; पाहा कोणते शेअर्स वाढले?

T20 WC, IND vs ZIM: टिम इंडियात ट्विस्ट... संघाचा विश्वासार्ह फिनिशर परतला; आता समीकरणच बदलणार?

आमच्यामध्ये वाद आहेत... भावासोबतच्या नात्यामधील तणावावर पहिल्यांदाच बोलला अजिंक्य देव; म्हणाला- एक भाऊ म्हणून ...

केंद्राकडून निधी मिळेना, मंत्र्यांचं रडगाणं; पाठपुरावा करा म्हणत राहुल नार्वेकरांनी विधानसभेत दोन नेत्यांना फटकारलं

SCROLL FOR NEXT