Harmanpreet Kau esakal
क्रीडा

Harmanpreet Kaur : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत व्हाईट वॉश अन् हरमनच्या नावावर झाला अप्रिय विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघासाठी आजचा दिवस वाईट ठरला. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा तिसरा सामना भारताने 190 धावांनी गमावला. भारताला या मालिकेत एकही सामना जिंकता आलेला नाही. दरम्यान, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर एक अप्रिय रेकॉर्ड झाला आहे.

हरमनप्रीत कौरने या मालिकेत केलेल्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर कर्णधाराला पहिल्या सामन्यात फक्त 9 धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात हरमनप्रीत फक्त 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. दुसऱ्या सामन्यात भारताचा फक्त 3 धावांनी पराभव झाला. तिसऱ्या सामन्यात हरमनला तर 10 चेंडूत फक्त 3 धावाच करता आल्या.

अशा प्रकारे हरमनने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत फक्त 17 धावा केल्या. ती भारताकडून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत सर्वात कमी धावा करणारी कर्णधार झाली आहे. तिने शिखर धवन आणि मिताली राजलाही याबाबतीत मागं टाकलं.

  • हरमनप्रीत कौर 2023 - ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे मालिका - 17 धावा

  • पुर्णिमा राऊ 1995 - इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 24 धावा

  • मिताली राज 2006 - ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत 25 धावा

  • शिखर धवन 2022 - दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत 25 धावा

हरमन काय म्हणाली?

सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली की, 'मला वाटतं की वनडे मालिका आमच्यासाठी चांगली गेली नाही. काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. काही खेळाडूंना आपल्या कामगिरीत कशी सुधारणा करता येईल याचा विचार करावा लागेल. आम्ही कसोटी खेळत होतो त्यावेळी आमच्याकडे विचार करण्यास वेळ होता. मात्र मर्यादित षटकांच्या सामन्यात तुम्हाला असा विचार करण्यास वेळ मिळत नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT